![]()
नाशिक महामार्गावर दिवशी पिंपळगावजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय तरुणाचा शनिवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल बाळू करपे (२४, रा. माळीवाडगाव, ता. गंगापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विशाल करपे हा छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकीवरून स्वतःच्या गावाकडे परतत होता. दरम्यान, नाशिक महामार्गावरील दिवशी पिंपळगावजवळ त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला होता. अपघाताचे दृश्य पाहताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी विशालला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. विशालच्या अचानक निघून जाण्याने माळीवाड गावावर शोककळा पसरली आहे. विशालचा मनमिळाऊ स्वभाव अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या विशालच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. विशाल हा दुचाकीवरून गावाकडे येत होता. दिवशी पिंपळगावजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते.