Headlines

Keshav Upadhye Slams Opposition Over Karjat Bhima Shankar Power Project


हजारो कोटी रुपयांचा कोणताही प्रकल्प असा रात्रीतून सुरू होत नसतो. भीमा शंकर परिसरातील प्रकल्पासाठी तब्बल अठरा महिने प्रक्रिया चालून सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्यानंतरच हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपा

.

केशव उपाध्ये म्हणाले की, जे राजकारणी वर्षानुवर्षे जनतेने नाकारले आहेत आणि जे ‘दिमागी नक्षली’ सत्तेपासून वंचित आहेत, ते आज सत्तेचा मागमूस उरला नाही म्हणून अशा प्रकल्पांना विरोध करत आहेत. विकासाचा कोणताही प्रकल्प आला की त्याला विरोध करायचा, ‘फेक नरेटीव्ह’ सेट करायचे आणि लोकांची दिशाभूल करून महाराष्ट्राच्या विकासाला नख लावायचे, असा त्यांचा अजेंडा सुरू आहे.

म्हणून 10 हजार कोटींचा फटका

केशव उपाध्ये म्हणाले की, असाच विरोध यापूर्वीही महाराष्ट्राने आणि मुंबईने भोगला आहे. मविआ सरकारच्या काळात पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोचे काम थांबवण्यात आले होते. ते काम थांबवल्यामुळे राज्याला तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला होता. हे उद्धव ठाकरेंचे पाप होते, ज्याचा त्रास आजही राज्य भोगत आहे.

झाडे तोडण्यापेक्षा दुप्पट लागवड करणार

केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यात विजेची मागणी सातत्याने वाढत असून ती पूर्ण करण्यासाठी नवीन प्रकल्पांची नितांत गरज आहे. हा प्रकल्प वनविभागाच्या किंवा अभयारण्याच्या झोनमध्ये येत नाही. कंपनी गुजरातमधील असली, तरी तेथून तयार होणारी वीज महाराष्ट्रालाच मिळणार असून यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे. विकास आणि पर्यावरणामध्ये संतुलन राखतच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. या प्रकल्पासाठी जी काही झाडे तोडली जात आहेत, त्यापेक्षा कितीतरी अधिक झाडे वनविभाग आणि संबंधित कंपनीकडून लावली जाणार आहेत.

निसर्गाची राखरांगोळी करणारे प्रकल्प महाराष्ट्रात का? -सतेज पाटील

शासनाच्या दुटप्पी धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले, “राज्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सरकार सांगते की एल निनोमुळे पाऊस कमी झाला. मग अशा वेळी कर्जत-भीमाशंकरसारख्या सह्याद्रीच्या अत्यंत संवेदनशील पट्ट्यात तब्बल 3 लाख झाडे तोडण्याची परवानगी कशी दिली जाते? निसर्गाचा सत्यानाश करणारे असे विनाशकारी प्रकल्प दुर्दैवाने महाराष्ट्रात आणले जात आहेत.” वाचा सविस्तर

हे ही वृत्त वाचा मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?:कर्जतमधील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सरकारला सवाल, म्हणाले- जनतेने आता पेटून उठावे

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनंतर आता पर्यावरणप्रेमी आणि अभिनेत्यांनी या जंगलतोडीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून राज्यभरात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीवरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना वाळवंट करायचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

पर्याय असेल तर जंगल वाचवलंच पाहिजे, आवश्यक नसताना वृक्षतोड नकोच:सुधीर मुनगंटीवारांनी भूमिका, म्हणाले- संवादातून मार्ग काढला पाहिजे

भीमाशंकरच्या जंगलात वृक्षतोडीवरून राज्यात वाद पेटला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये हीच वनविभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.