![]()
सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पित्याने स्वतःच्या १० वर्षांच्या मुलीचे कपडे जबरदस्तीने काढून, तिच्या अंगावर थंड पाणी ओतून सिगारेटचे चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता या नराधम पित्याने मुलीच्या डोक्यावरील केस कापले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या २४ वर्षीय मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिसांनी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीनुसार, आरोपी पिता सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो पेंटिंगचे काम करतो. त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. पीडित मुलगी १० वर्षांची असून ती पाचवीच्या वर्गात शिकते. मुले पित्याचे ऐकत नसतील किंवा त्याच्या मनासारखे वागत नसतील तर तो त्यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचेही समोर आले आहे. रविवारी मध्यरात्री आरोपीने मुलीचे कपडे जबरदस्तीने काढत अंगावर थंड पाणी टाकले. तिच्या हात-पायांना सिगारेटने चटके देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. रडणाऱ्या बहिणीने मांडली भावासमोर आपबिती या घटनेनंतर रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडितेच्या मोठ्या भावाला त्याच्या काकांनी फोन केला. वडील आणि बहीण घरात नसल्याचे त्यांनी सांगितले. जटवाडा परिसरात राहणाऱ्या मावशीच्या मुलीचा फोन आला. पीडित मुलगी तिथे पोहोचल्याचे तिने सांगितले. मोठा भाऊ तत्काळ तिथे पोहोचला. तेव्हा बहिणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. भयभीत चिमुकलीने रात्री घडलेला सर्व प्रकार भावाला सांगितला. यानंतर भावाने थेट पोलिस ठाणे गाठत जन्मदात्या पित्याविरुद्ध तक्रार दिली.
Source link
संभाजीनगरात पाचवीतील मुलीला विवस्त्र करत दिले सिगारेटचे चटके:पित्याच्या विरोधात गुन्हा, डोक्याचे केसही कापले; संतापलेल्या भावाची पित्याविरुद्ध पोलिसांत तक्रार