Headlines

मराठवाडा पदवीधरमध्ये रा.काँग्रेसचे डॉ. पाटील 10,003 मतांनी पुढे:3.00 वा. 1,01,519 मतांची मोजणी पूर्ण, निकालाकडे सर्वांचे लक्ष




विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला झालेल्या मतदानाची मोजणी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाली. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतपत्रिकांवर प्राधान्यक्रमाने मतदान होते. त्यामुळे मतमोजणी संथगतीने सुरू होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात रात्री 3 वाजता दीड फेरी पूर्ण झाली. त्यावेळी 1,01,519 मतांची मोजणी झाली होती. त्यापैकी 93,136 मते वैध ठरली, तर 8383 मते बाद झाली. यापैकी मविआ शरद पवार गटाचे डॉ प्रताप पाटील यांना 39,753 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांना 29,750 मते मिळाली होती. दरम्यान, मतपत्रिकांची मोठी संख्या, सरमिसळ व पसंतीक्रमाची गुंतागुंतीची प्रक्रिया, विजयासाठी मतांचा कोटा निश्चित करणे आणि प्रथम पसंतीची मते मोजण्याचे काम उशिरापर्यंत सुरू असल्याने अंतिम चित्र स्पष्ट झालेले नव्हते. ज्या 5 मतदारसंघांत ही निवडणूक झाली तेथे 2020 मध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नव्हती. सर्वपक्षीय बंडखोरांमुळेही ही निवडणूक चुरशीची झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *