Headlines

मंत्रिमंडळ निर्णय:1.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून 5 हजार रु. जमा होणार, 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत




केंद्र सरकारकडून दुष्काळी मदतनिधी मिळण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे अग्रिम मदतीपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला होता. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम रक्कम २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर कालावधीत जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासाठी ७५०० कोटी रुपयांच्या विशेष तरतुदीला मंजुरी देण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी मदतीसाठी ६ हजार कोटी रुपये लागतील, असे म्हटले होते. दरम्यान, सरकारने आदेश देऊनही राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बँक, सावकार तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून छळवणूक सुरू आहे. त्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली. शेतकऱ्यांना नडाल तर थेट ३०२ दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला. ५ हजार रुपये अग्रिम मदत आहे, दुष्काळाचे इतर सर्व निकष आणि लाभ पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्या शेतकऱ्याला मिळेल रक्कम कालावधी : २९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात रक्कम वर्ग होईल.
पात्रता तपासणी व पोर्टल : शेतकरी शासनाच्या अधिकृत या पोर्टलवर जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्रावर आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात.
तक्रार निवारण : रक्कम खात्यात जमा न झाल्यास संबंधित गावपातळीवर कृषी सहायक, तलाठी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधता येईल.
अंतिम भरपाईची कालमर्यादा : महसूल व कृषी विभागाचे ३३ टक्क्यांवरील नुकसानीचे अंतिम पंचनामे १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जातील आणि त्यानंतर दुष्काळी निकषांनुसार उर्वरित संपूर्ण आर्थिक पॅकेज शेतकऱ्यांना वितरित केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. अमरावतीत विष घेतल्याने शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू अमरावती | सततची नापिकी, दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कविठा येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद जवेकर आणि त्यांच्या पत्नी नंदाबाई (४२) यांनी २३ ऑक्टोबर रोजी कीटकनाशक प्राशन केले. दोघांना परतवाडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकाचे बंधन नाही दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील शेतकरी. खरिपाचे किमान ३३% किंवा त्याहून अधिक नुकसान. १ नोव्हेंबर २०२५ नंतर ई-केवायसी पूर्ण असलेल्यांना फेरपडताळणीची सक्ती नाही. ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक नसला तरी वैध वनपट्टा व ई-केवायसीच्या आधारे मदतीस पूर्णपणे पात्र.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *