नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या निवडणुकीत झालेल्या एकूण 1 लाख 65 हजार 541 मतदानापैकी तब्बल 15 हजार 106 मते अवैध ठरली आहेत. उच्चशिक्षित पदवीधरांच्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर म
.
सुधाकर कोहळे म्हणाले की, आमची अनेक मते कोणतीही ठोस कारणे नसताना अवैध घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्व अवैध ठरवलेल्या मतांची पुन्हा एकदा फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी आपण निवडणूक प्रशासनाकडे केली असल्याचे कोहळे यांनी सांगितले.
दुसऱ्या पसंतीच्या मतांवर आमचाच विजय होईल- कोहळे
सुधाकर कोहळे म्हणाले की, सध्या बाद फेरीची मतमोजणी सुरू असून, पहिल्या पसंतीच्या मतांमधील आमची 4 हजारांहून अधिक मतांची आघाडी काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत भरून काढता येईल असे वाटत नाही. दुसऱ्या पसंतीची मतेही आम्हालाच मिळतील आणि शेवटी विजय आमचाच होईल, असा विश्वास नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला आहे.
कराळे ठरणार ‘किंगमेकर’
नागपूर पदवीधरच्या आमदारकीचा संपूर्ण फैसला आता तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच अवलंबून आहे. थोड्याच वेळात कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होणार आहे. या मोजणीत नितेश कराळेंचे समर्थक कोणाला कौल देतात काँग्रेसच्या वंजारींना की भाजपच्या कोहळेंना यावरच नागपूर पदवीधर मतदारसंघाचा अंतिम विजेता निश्चित होणार आहे.
नागपुरात कॉंग्रेस-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने
नागपुरात मतमोजणी केंद्रासमोरील मुख्य मार्गावर कॉंग्रेस-भाजपचे कार्यकर्ते मध्यरात्री आमनेसामने आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला.
हे ही वृत्त वाचा
मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर:पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. वाचा सविस्तर