![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात सध्या नळाद्वारे पिवळसर, गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने येथील ग्रामस्थांना हेच दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, गावात सा
.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेसाठी खंडाळा गावात तब्बल १ कोटी २६ लाख ७० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ही योजना केवळ कागदावरच आणि नावापुरतीच राहिल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नळाला येणारे पाणी पिवळ्या रंगाचे आणि गढूळ आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट दिसत असूनही त्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीची वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही, त्यात पुरेशा प्रमाणात ब्लीचिंग पावडर किंवा क्लोरीन टाकले जात नाही, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
या दूषित पाण्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कावीळ, उलट्या-जुलाब, ताप यासारख्या साथीच्या रोगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून खंडाळा गावासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी खंडाळ्यातील ग्रामस्थांमधून होत आहे.
लवकरच टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जाईल Ãदोन आठवड्यांपूर्वी गट विकास अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कोल्ही प्रकल्पावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली होती. खंडाळा येथे सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे दूषित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खंडाळा गावाला लवकरात लवकर टँकर मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली असल्याने लवकरच टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जाईल. यासाठी मी पाठपुरावा करत आहे. -संजय पाटील निकम, जिल्हा परिषद सदस्य
पर्यायी व्यवस्था नसल्याने हेच पाणी नळाला सोडावे लागते Ãकोल्ही प्रकल्पात मृत साठा असल्याने पूर्ण पाणी दूषित असून प्रकल्पातील विहिरीच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असून पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल ग्रामपंचायत कार्यालयास प्राप्त झाला आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने हेच पाणी नळाला सोडावे लागते. ग्रामपंचायतीच्यावतीने वरिष्ठ कार्यालयास टँकर मंजूर करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. -अमय पवार, विस्तार अधिकारी तथा प्रशासक, खंडाळा