Headlines

कोबी 2 रुपये किलो; शेतकऱ्याने 60,000 किलोवर फिरवला रोटर:15 दिवसांपासून भावात घसरण, कोबी विकून खर्चही निघणे कठीण




शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. चौगाव येथील शेतकरी सुरेश मांडवडे यांनी अजमेर सौंदाणे शिवारातील गट क्रमांक ८३५/१ मध्ये दोन एकर कोबी लावली होती. मात्र, अवघा दोन रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने दोन एकर शेतातील सुमारे ६० टन तयार कोबी प्लॉटवर रोटर फिरवला. पिकासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी घेतलेल्या या निर्णयातून शेतकऱ्यांची हतबलता समोर आली आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात खते, बियाणे आणि शेतीच्या अन्य निविष्ठांचे वाढलेले दर यामुळे पीक उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी पिके जगवतो, त्यासाठी मोठा खर्च करतो; मात्र बाजारात माल विक्रीसाठी नेल्यानंतर अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. {६०,००० किलो कोबी काढण्यास ६० हजार रु. खर्च {गोणीसाठी १८ हजारांचा खर्च {शिवाय टनाला २ किलो कटती याप्रमाणे एकूण १२० किलो कटती आली असती यातून २४० रुपये खर्च. {वाहतूक खर्च एकूण १० हजार {सेवाकर – ६ हजार रु. { एकूण खर्च -९४,२४० { हाती २५७६० इतकेच पैसे राहणार असल्याने मेहनत वाया गेली असती; त्यामुळे फिरवला रोटर. नामपूर येथील खासगी भाजीपाला खरेदी केंद्रात १३ बॅगांमधून ४०६ किलो कोबी विक्रीसाठी पाठवली होती. कोबीला दोन रुपये दराने ८१२ रुपये मिळाले. त्यातून २०३ रुपये सेवाकर (हमाली, तोलाईचा खर्च) कट होऊन शेतकऱ्यांच्या हाती ६०९ रुपये आले. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी उभ्या कोबी पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला. एकीकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना दुसरीकडे शेतीमालाचे दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. ^ दोन एकर कोबीसाठी दीड लाख रुपये खर्च झाले. प्लॉटचा पहिलाच तोडा १३ बॅग निघाल्या यातून दोन रुपये दर मिळाला. भाव वाढेल, अशी अपेक्षा होती मात्र भाव वाढला नाही. अखेर रोटर फिरवला. रास्त भाव मिळावा , अशी बाजारव्यवस्था निर्माण व्हावी, अशीच सरकारकडून अपेक्षा आहे. – सुरेश मांडवडे, शेतकरी चौगाव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *