![]()
सोयगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संकेत राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांनी दुपारी दीड वाजता या निवडीची अधिकृत घोषणा केली. दिवंगत संचालक राजेंद्र राठोड यांच्या निधनामुळे हे संचालकपद रिक्त झाले होते. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला संघाच्या १६ पैकी १५ संचालकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती, तर एक संचालक गैरहजर होता. संकेत राठोड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. या अर्जासाठी राधेश्याम जाधव यांनी सूचक, तर भगवान वेहेळे यांनी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली. निवडणूक प्रक्रियेचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार अधिकारी देवकर, संघाचे व्यवस्थापक बन्सीलाल बेडवाल, सचिव दिलीप रावणे आणि विलास घुगे यांनी सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, आबासाहेब काळे, कुणाल राजपूत, राधेश्याम जाधव, भगवान वेहेळे, संतोष बोडखे, गोविंदा घोडे, स्वप्निल पाटील, अतुल बोरसे, गौरव बिंदवाल, संदीप राठोड, अनिल चव्हाण, चंदू कदम, आबा पवार, दिलीप पवार, आशु चौधरी, सोनू मोर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी शिवसेनेचे संकेत राठोड यांची निवड:सोयगाव येथे आयोजित बैठकीला 16 पैकी 15 संचालकांची उपस्थिती