Headlines

उत्पादन वाढल्याने झेंडूला मिळतोय अवघा 10 ते 15रुपये किलो भाव:भरघोस उत्पादनानंतरही अपेक्षित दर नसल्याने काढणी-मजुरीचा खर्चही निघेना



दिवाळीच्या तोंडावर झेंडूच्या दरात मोठी घसरण झाल्याने जायखेडासह बागलाण तालुक्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कमी पाण्याचे पीक आणि एकरी सुमारे ३ टन झेंडूचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. उत्पादन वाढल्

.

एका टन मालाच्या वाहतुकीसाठी ६ हजार रुपये खर्च येत असून, फुलांची काढणी करण्यासाठीही ४० मजुरांची गरज भासते. त्यामुळे कमी बाजारभावात वाहतूक आणि काढणीचा खर्च भागवणे जिकिरीचे झाले असल्याचे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी झेंडूला किलोला ६० ते ८० रुपये भाव मिळत होता. त्या तुलनेत यंदा दर १० ते १५ रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. त्यामुळे झेंडूचे उत्पादन आणि त्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ साधणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. झेंडूच्या लागवडीसाठी मेहनत आणि खर्च केल्यानंतर फुले बाजारात विक्रीसाठी नेली जातात; मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

दसरा सणाला झेंडूच्या फुलांना अपेक्षित भाव न मिळाल्याने दिवाळीत तरी दर सुधारतील, अशी उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती. दिवाळीतील पूजाविधी आणि घरांच्या सजावटीसाठी झेंडूच्या फुलांची मागणी वाढून दर सुधारतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावरही बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उत्पादन चांगले असूनही वाहतूक आणि काढणीचा खर्च भागवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

शेतात झेंडू फुलवला; पण बाजारात किलोला अवघा १० ते १५ रुपये भाव मिळत असल्याने लागवड आणि वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाला आहे. गेल्या वर्षी किलोला ६० ते ८० रुपये भाव मिळत होता. यंदा दर घसरल्याने उत्पादन चांगले असूनही पदरी निराशा पडली आहे. – संजय सोनवणे, झेंडू उत्पादक शेतकरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *