Headlines

विद्यार्थ्यांना बालहक्क, सायबर गुन्हे, सुरक्षित-असुरक्षित स्पर्शाचे दिले धडे:मंगळवेढ्यात सुरक्षित बचपन अभियानातून पोक्सो, बालविवाहाविरोधात जनजागृती



बालकांचे हक्क, संरक्षण आणि कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील विलासराव देशमुख विद्यालयात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या

.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंगळवेढा तालुका विधी सेवा समिती, मंगळवेढा विधिज्ञ संघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सोलापूर आणि मंगळवेढा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाला सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम. एस. माळी, मंगळवेढा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आर. आय. शेख आणि उपाध्यक्ष ॲड. एम. डी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिदास घोडके यांनी केले, तर अरविंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी अकिल दरवाजकर, ॲड. इरफान सय्यद, ॲड. प्रतीक बुरकूल, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी विश्वनाथ मोरे, विधी स्वयंसेवक प्रतीक भोसले आणि पोलिस कर्मचारी आण्णासाहेब बाबर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सायबर गुन्हे, बालशोषणाविषयी जागृती पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी ‘सुरक्षित क्लिक, सुरक्षित बचपन’ या विषयावर इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर गुन्हे, ऑनलाइन शोषण आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. ॲड. जी. डी. चव्हाण यांनी ‘बोलो, बताओ, बचाओ’ या विषयातून सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, विश्वासू व्यक्तीकडे मदत मागणे आणि तक्रार करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. महिला सक्षमीकरण विभाग, सोलापूरचे वैभव खुळे यांनी ‘ना बालविवाह, ना बालशोषण’ या विषयावर बालविवाह प्रतिबंध आणि बालशोषणाविरोधात जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांना बालविवाहविरोधी शपथ देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *