Headlines

शेतामध्ये गुप्तधनासाठी ‎जादूटोणा अन् अघोरी पूजा:मनसे तालुका अध्यक्षासह सात जणांवर गुन्हा




अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील ‎शेंडी गावठाण शिवारात अंधश्रद्धेचा ‎धक्कादायक प्रकार उघडकीस‎ आला आहे. शेतात खड्डा खोदून ‎गुप्तधन काढण्याच्या नावाखाली ‎अघोरी पूजा आणि जादूटोणा ‎केल्याप्रकरणी राजूर पोलिसांनी‎ मनसेच्या तालुका‎ अध्यक्षासह सात जणांविरुद्ध गुन्हा‎ दाखल केला आहे. 27 ऑक्टोबर रोजी रात्री फिर्यादी ‎एकनाथ दादू भांगरे यांच्या शेतात 8‎ ते 9 जण घुसले होते. आरोपींनी ‎शेतात खड्डा खोदून कापूर,‎अगरबत्ती पेटवली आणि मंत्र म्हणत ‎गुप्तधन काढण्याचा बनाव केला.‎ मुख्य इसम गुप्तधन काढून देतो,‎ पैशांची मागणी करू लागला.‎ ग्रामस्थांनी जाब विचारला असता,‎ टोळक्यातील एकाने आपण पोलिस‎ असल्याचे सांगून दहशत निर्माण‎ केली. मात्र, ग्रामस्थांनी 112 ‎क्रमांकावर फोन करून राजूर‎ पोलिसांना बोलावून घेतले.‎ पोलिसांनी घटनास्थळावरून‎ खोदलेला खड्डा, जळालेला कापूर,‎ पूजेचे साहित्य आणि दोन‎ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.‎ या प्रकरणी ज्ञानेश्वर नामदेव लेंडे‎( मनसे अध्यक्ष, राजूर विभाग)‎ यांच्यासह योगेश वानखेडे, त्र्यंबक‎ वानखेडे, अनंता हिंगोले, गणेश ‎घोरपडे, रुपेश वानखेडे आणि‎ संजय खाडे यांच्यावर जादूटोणा‎विरोधी कायदा व भारतीय न्याय‎संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात ‎आला आहे. पुढील तपास राजूर ‎पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर ‎पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू‎ असून, अकोले तालुक्यातील दुर्गम‎भागात गुप्तधनाच्या अफवांमधून‎ भोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक‎ करणाऱ्या टोळ्यांपासून सावध ‎राहण्याचे आणि अशा घटना‎ निदर्शनास आल्यास तात्काळ ‎पोलिसांशी संपर्क साधण्याचे‎ आवाहन राजूर पोलिसांनी केले‎ आहे. अहिल्यानगरात घरफोडी करणारी‎मध्यप्रदेशातील टोळी जेरबंद‎ अहिल्यानगर शहरातील शिवनेरी चौकातील मातोश्री ‎‎अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा ‎‎उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणी ‎‎मध्यप्रदेशातील मुख्य आरोपींसह चोरीचा माल ‎‎विकत घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ‎‎दोघांनाही पकडण्यात आले असून‎ त्यांच्याकडून 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा ‎‎मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.‎ 13 ऑक्टोबर रोजी विवेक मारोतराव साखरे ‎‎यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ‎सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम‎ चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. स्थानिक ‎गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या‎ पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास‎ करत नेवासा फाटा परिसरातून मुख्य आरोपी ‎कपिल चंपालाल चावडा (वय 23, रा. पटवारी ‎कॉलनी, बडवा, ता. महेश्वर, जि. खरगोण,‎मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.‎ त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने‎ आपला साथीदार राजा चेयनसिंग पटेल (वय 23, रा. जयमलपुरा, बडवा, ता. महेश्वर, जि.‎खरगोण, मध्यप्रदेश) याच्या मदतीने ही चोरी ‎केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राजा पटेल‎यालाही ताब्यात घेऊन चोरीचे हे दागिने विकत ‎घेणारे अनिल रामनारायण तिवारी (56, रा.‎खाराकुवा, संभाजीनगर) आणि भारत‎ नानासाहेब जोशी (वय 32, रा. हरिओमनगर,‎संभाजीनगर) या दोघांनाही ताब्यात घेतले.‎ बंद घराच्या शोधात फिरते टोळी‎ मध्यप्रदेशातील घरफोड्या करणाऱ्या‎ आरोपींची टोळी बंद घरे किंवा‎ अपार्टमेंटमधील घरे शोधण्यासाठी शहराच्या‎ विविध भागात विशेषतः फारशी वर्दळ‎ नसलेल्या भागात फिरतात. बंद घर दिसताच ‎काही वेळ थांबून नजर ठेवतात व डाव‎ साधतात. एका ठिकाणी घरफोडी केल्यावर ते‎ तत्काळ शहर सोडतात व दुसऱ्या शहरात‎ आश्रय घेतात. काही ठिकाणी पाळत ठेऊन,‎ तर काही ठिकाणी ही टोळी संधी मिळताच‎ घरफोड्या करत असल्याचे समोर आले.‎‎‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *