Headlines

Purnekar Murder Case; Minakshi Shinde Resigns From Thane Women Chief Post


ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, या प्रकरणात अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या हत

.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाला आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला असतानाच ठाकरे गट, सर्वपक्षीय कृती समिती आणि पूर्णेकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांमुळे शिंदे सेनेची मोठी कोंडी झाली होती. मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर पत्रकार परिषदेत मिनाक्षी शिंदे यांनी पदावरून बाजूला व्हावे असा सूचक सल्ला दिल्यानंतर अवघ्या 24 तासांत हा राजीनामा पुढे आला आहे.

कटात सहभागाचा थेट आरोप; पूर्णेकर कुटुंबीयांकडून अटकेची मागणी

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांचे नाव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. 29 सप्टेंबर रोजी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पूर्णेकर यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी या हत्येच्या संपूर्ण कटामागे मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. तसेच यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ क्लिप्सही समोर आणल्याचा दावा करण्यात आला होता.

ठाण्यात आंदोलनांचा भडका

गेल्या काही दिवसांत ठाण्यातील घोडबंदर रोडवर तब्बल 6 ते 7 तास रास्ता रोको करून संतप्त समर्थकांनी टायर जाळले होते, तर नौपाडा पोलीस ठाण्यावर शेकडो नागरिकांनी धडक दिली होती. पोलिसांकडून मिनाक्षी शिंदे यांना राजकीय दबावापोटी संरक्षण दिले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत होते.

प्रताप सरनाईकांच्या भूमिकेनंतर 24 तासांत सूत्रे हलली

बुधवारी ठाण्यात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदे यांच्याबाबत अत्यंत थेट आणि रोखठोक वक्तव्य केले होते. “जर माझ्यावर असे आरोप झाले असते, तर जोपर्यंत आरोप चुकीचे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी स्वतःहून पदापासून बाजूला राहिलो असतो. पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप होत असताना पक्षाचे पद बाजूला काढून ठेवणेच योग्य ठरेल, ही भूमिका मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सांगितली आहे,” असे सरनाईक म्हणाले होते.

पक्षश्रेष्ठींचा संदेश

सरनाईकांच्या या वक्तव्यानंतर शिंदे सेनेच्या अंतर्गत वर्तुळात प्रचंड हालचाली सुरू झाल्या. पक्षाची प्रतिमा डागाळू नये आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळू नये, यासाठी पक्षश्रेष्ठींनी मिनाक्षी शिंदे यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आदित्य ठाकरे ठाण्यात येण्यापूर्वीच शिंदे सेनेचे ‘डॅमेज कंट्रोल’

आज ठाण्यात राजकीय तापमान टोकाला पोहोचले आहे. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राजन विचारे हे आज प्रदीप पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत असून, त्यानंतर ते ठाणे पोलीस आयुक्तांना भेटून मुख्य सूत्रधारांच्या अटकेची मागणी करणार आहेत.

संभाजीनगर आणि नागपूर निकालांनंतर बॅकफूटवर

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत पदवीधरांच्या 3 ही जागांवर महायुतीचा पराभव झाल्याने महायुती सरकारवर आधीच चौफेर टीका होत आहे. त्यातच ठाण्यातील या हत्याकांडावरून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा घेऊन शिंदे सेनेने हे ‘डॅमेज कंट्रोल’ केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला, तरी पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे गट त्यांच्या अधिकृत अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. ठाणे पोलीस आता मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीची प्रत्यक्ष चौकशी कधी करणार, त्यांना या प्रकरणात सहआरोपी केले जाणार का, आणि पोलीस आयुक्त यावर काय ठोस भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

—————————————————–

हेही वाचा…

आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा!:ही माझी प्रांजळ भूमिका; पूर्णेकर हत्या प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचे मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य

शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाला आज तब्बल 1 महिना पूर्ण झाला असतानाच ठाण्यातील राजकीय वातावरण अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. या हत्याकांडाच्या कटामागे शिवसेनेच्या (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा हात असल्याचा थेट आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत अत्यंत सूचक आणि खळबळजनक विधान केले आहे. “एखाद्या नेत्यावर गंभीर आरोप होत असतील, तर आरोप खोटे सिद्ध होईपर्यंत त्यांनी स्वतःहून पक्षाचे पद बाजूला ठेवणे योग्य ठरेल; हीच माझी प्रांजळ भूमिका असून मी ती एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातली आहे,” असे सांगत सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदे यांना पदावरून पायउतार होण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.