![]()
नांदेड शहरातील नंदीनगर येथे जुन्यावादातून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. या खुनाच्या प्रकरणात मुदखेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत 12 आरोपींना अटक केली. 28 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. नंदीनगर येथे दोन गटांत जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद उफाळून आला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अर्जुन ऊर्फ अजय शिवाजी नकलवाड या युवकाला आरोपींनी छातीवर दगड व विटांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अर्जुन जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत युवकाची आई लक्ष्मीबाई शिवाजी नकलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच 12 जणांना केली अटक गुन्हा दाखल होताच मुदखेड पोलिसांनी शोधमोहीम राबवली. काही तासांत 12 आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये भीमराव नकलवाड, सुभाष भीमरावनकलवाड, रमेश भीमराव नकलवाड, राहुल भीमराव नकलवाड, बाबुशाभीमराव नकलवाड, शेषराव ऊर्फ केशव गोविंद नकलवाड, संभाजी शेषरावनकलवाड, मारोती शेषराव नकलवाड, अर्जुन ऊर्फ राजेश शेषरावनकलवाड, रवी ऊर्फ मुन्ना नकलवाड आणि सुनील भीमराव नकलवाडयांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. नांदेडला फायनान्सच्या मॅनेजरसह नऊ अटकेत नांदेड येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी ‘केएफएंटरप्रायजेस’ या फायनान्स कंपनीशी संबंधित मुख्य आरोपीसह आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीचा भागीदार,मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. माळकौठा (ता. मुदखेड) येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 533/2026 नुसार विविधकलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी डॉ. नीलाभ रोहन यांनी एसआयटीची स्थापना केली आहे.या प्रकरणात 9 जणांना अटक केली.
Source link
नांदेडला जुन्या वादातून युवकाचा दगड, विटांनी मारहाण करून खून:नंदीनगर येथील घटना; 12 आरोपींना अटक, भांडण सोडवणाऱ्यावर हल्ला