![]()
१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांमार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना व विकासकामांसाठी ही माहिती आधारभूत असल्याने नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून, तहसीलदार सचिन मुळीक यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या प्रशिक्षणात २०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जनगणनेची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासाठी एकूण ३९८ प्रगणक, ६७ पर्यवेक्षक व ४६ राखीव कर्मचारी अशा एकूण ५११ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. या सर्वांना तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे. यावेळी नायब तहसीलदार संदेश भोसले, महसूल सहायक राहुल शिंदे, तांत्रिक सहायक सोमनाथ सोनवणे,अल्ताफ कोरबू प्रशिक्षण अधिकारी महेश कोटीवाले आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाचे तीन टप्पे नियोजित असून पहिला टप्पा २३ ते २५ एप्रिल, दुसरा टप्पा २७ ते २९ एप्रिल आणि अंतिम टप्पा ४ ते ६ मे दरम्यान पार पडणार आहे. या माध्यमातून सर्व ५११ कर्मचाऱ्यांना जनगणनेचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल अशी माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
Source link
1 ते 15 मे स्वगणनेचा टप्पा:16 मेपासून घरोघरी जाऊन नोंदणी, मोहोळला पहिल्या टप्प्यात 200 कर्मचाऱ्यांचा सहभाग