![]()
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी पक्ष आणि कुटुंबापासून वेगळे होत नवीन पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे नाव ‘टीआरएस’ (तेलंगणा राष्ट्र सेना) असे असेल. विशेष म्हणजे त्यांचे वडील नेतृत्व करत असलेल्या ‘भारत राष्ट्र समिती’चे (बीआरएस) मूळ नाव ‘टीआरएस’ (तेलंगण राष्ट्र समिती) हेच होते. पक्षाचे नाव व धोरणांची घोषणा करताना कविता यांनी सत्ताधारी काँग्रेस, भाजप व बीआरएसवर टीका केली. त्यांनी वडिलांना ‘बदललेली व्यक्ती’ संबोधले. त्यांचा पक्ष २०२८ मध्ये निवडणूक लढेल. महिलांवरील प्रभाव ठरणार ‘गेमचेंजर’ राजकारणात प्रवेशापूर्वी कविता यांनी २००८ मध्ये ‘तेलंगण जागृती’ ही सामाजिक व सांस्कृतिक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचा वापर करून त्यांनी राज्यभरातील महिलांमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली. या संघटनेचे जाळे प्रत्येक जिल्ह्यात व गटात असून १ लाखांहून अधिक व्यावसायिक महिला या संघटनेशी जोडल्या गेल्या. या माध्यमातून कविता यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.कविता आपल्या नवीन पक्षाची बांधणी याच संघटनेच्या माध्यमातून करतील, असे मानले जाते. या संघटनेने लोकसंस्कृती, सणांच्या माध्यमातून जनतेला जोडले आहे.
Source link
तेलंगणातील समीकरण:कविता यांचा नवा पक्ष,वडिलांची चिंता वाढली