Headlines

मुंबईसह उपनगरांत रिमझिम पाऊस:विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज




सध्या ऑक्टोबर हिट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ मात्र काहीशी दिलासादायक ठरली. मुंबईसह उपनगरातील अनेक भागांमध्ये अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावली. ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे वातावरणात झालेल्या या बदलामुळे काही काळ उकाड्यापासून मुक्ती मिळाली असली, तरी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. या वादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम नसला, तरी हवामानात बदल जाणवत असून हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत कुठे पडला पाऊस? गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी अचानक दर्शन दिले. मुंबईतील दादर, शिवाजी पार्क, शिवसेना भवन, दादर रेल्वे स्टेशन तसेच माटुंगा परिसरात रिमझिम पाऊस झाला. यासोबतच पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाड या भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे सकाळचे वातावरण थोडे गार झाले होते, मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा उकाडा जाणवू लागला होता. ‘अर्णब’ चक्रीवादळ आणि राज्यातील वातावरण: सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला, तरी त्यामुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे आधीच पाऊस गायब होता आणि राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, गुरुवारी (२९ ऑक्टोबर) राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान खात्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत (३० आणि ३१ ऑक्टोबर) राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र: तळ कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. नाशिक, पुणे (घाटमाथा) आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ: अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. —————————- हेही वाचा.. भूतानमध्ये ग्लेशिअर लेक फुटला, गरम पाण्याचा कुंड वाहून गेला: हायवे, रस्ते उखडले; बंगाल-आसामला पुराचा अलर्ट, 10 हजार जण शिफ्ट
भूतानमधील ‘शिंताफू’ (Shintafu) हिमनदीच्या सरोवरातून गुरुवारी रात्री उशिरा अचानक पाणी बाहेर पडल्यामुळे (glacial lake outburst) मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पाण्याच्या या प्रचंड प्रवाहाने परिसरातील ‘गासा त्साचू’ (Gasa Tshachu) नामक प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा पूर्णपणे वाहून नेला आहे.या पुरामुळे पुनाखा-गासा महामार्गाचा काही भाग नष्ट झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *