Headlines

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक:16 वर्षीय मुलाचा मृत्यू




लासूर स्टेशन | सावंगी शिवारात साई पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी घडली. कृष्णा जनार्दन गवळी (१६,रा. गवळीशिवरा, गाजरमळा ता. गंगापूर) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक नागपूर मुंबई मार्गावरील साई पेट्रोल पंपासमोर उभा होता. यावेळी कृष्णा गवळी हा दुचाकीवरून घराकडे जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रोडवर उभ्या ट्रकच्या चालकाच्या बाजूकडील मागील भागाला धडक बसली. या अपघातात कृष्णाच्या तोंडाला व डोक्यात मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र,वैद्यकीय अधिकारी डॉ. खरात तपासणी करून त्याला मृत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *