![]()
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू करण्यासाठी काँग्रेसने सातत्याने दबाव आणला. त्यानंतर मेट्रो सुरू होत आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केला. मंजुरी मिळाल्यानंतर १०० दिवसांहून अधिक काळ मेट्रो सुरू करण्यास उशीर का झाला, याचे उत्तर भाजप नेत्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. माण-हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर २३ पैकी १७ स्थानकांवर मेट्रो थांबणार आहे. या मार्गाच्या कामाला २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली. काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र मुदत वाढवून मार्च २०२६ करण्यात आली. यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणी करून मेट्रो चालवण्यास मंजुरी दिली. तरीही १०० दिवसांहून अधिक काळ मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यात आली नाही, असे जोशी म्हणाले. भाजप नेते तांत्रिक कारणे सांगत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून उद्घाटनाचा गाजावाजा करण्यासाठी विलंब झाल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने पीएमआरडीएकडे निवेदने दिली आणि आंदोलनाचा इशारा दिला. प्रसारमाध्यमांतून भाजप नेत्यांना विलंबाचे कारण विचारले. काँग्रेसच्या दबावानंतर ३ नोव्हेंबरपासून मेट्रो सुरू होईल आणि हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होईल, असे जोशी यांनी सांगितले. पुणेकरांचे हित जपणारे प्रभावी नेतृत्व भाजपकडे नाही, अशी टीका त्यांनी केली. याआधीच्या मेट्रो मार्गांवर केवळ ४-५ किलोमीटरचे अंतर पूर्ण झाल्यावरही भाजपने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केले. अशा छोट्या अंतराच्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांकडून करून घेणे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कमी करणारे आहे, असे जोशी म्हणाले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला उशीर झाल्याने वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसने आंदोलने केली आणि जनमताच्या दबावामुळे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान मेट्रोचे ऑनलाइन उद्घाटन करतील, असा दावा जोशी यांनी केला. हा काँग्रेस आणि पुणेकरांचा विजय असल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील इतर मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. त्यांचे ३-४ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रकार भाजपने थांबवावा, असे जोशी म्हणाले. पंतप्रधानांना पुण्यात बोलावण्यासाठी अनेक महिने थांबण्याऐवजी मेट्रो लवकर सुरू करण्यावर भर द्यावा, अशी पुणेकरांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ——- हेही वाचा.. राज्यात अवकाळीचा तडाखा!:पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांत पाऊस; कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नागरिक वाढत्या उकाड्याने आणि कडक उन्हाने हैराण झाले होते. मात्र, राज्यात अचानक हवामानात बदल झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी संध्याकाळपासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी आगामी काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा
Source link
काँग्रेसच्या दबावानंतर हिंजवडी मेट्रो सुरू होणार:माजी आमदार मोहन जोशींचा दावा, मंजुरी मिळूनही 100 दिवसांहून अधिक विलंब का? भाजप नेत्यांना सवाल