Headlines

बुलेटप्रूफ काचेआडून चाहत्यांना दर्शन:काँग्रेसचा बिग बींसह मोदी सरकारवर तिखट वार; प्रत्येक कलाकारांसाठी 'नमो बॉलिवूड सुरक्षा योजना' सुरू करा!




महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक बुलेटप्रूफ काचेची केबिन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. दिलजीत दोसांझ संबंधित हल्ल्याच्या घडामोडी, टायगर श्रॉफवरील गोळीबार आणि खुद्द अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला उडवून देण्याच्या आलेल्या गंभीर धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था कमालीची कडक केली आहे. रविवारी हजारो चाहत्यांचे अभिवादन स्वीकारताना बिग बी मुलगा अभिषेक बच्चनसह थेट एका बुलेटप्रूफ काचेच्या मंचावरून (ट्रॉली) समोर आले. मात्र, यावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकार आणि अमिताभ बच्चन यांच्यावर उपरोधिक शब्दांत जोरदार हल्ला चढवला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकारांसाठी तातडीने ‘विशेष नमो बॉलिवूड जीवन सुरक्षा योजना’ जाहीर करावी आणि ‘दीवार’ सिनेमात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला ‘बिल्ला क्रमांक ७८६’ चे वाटप करावे,” असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. ‘जलसा’बाहेर बुलेटप्रूफ काचेचा पहारा गेल्या कित्येक दशकांपासून दर रविवारी अमिताभ बच्चन हे जुहू येथील आपल्या ‘जलसा’ बंगल्याच्या प्रवेशद्वारावर येऊन देशभरातून जमलेल्या हजारो चाहत्यांना हात जोडून अभिवादन करतात. बॉलिवूड सेलिब्रिटींना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा नियमावली अधिक कडक केली आहे. त्यामुळे रविवारी बिग बी थेट उघड्या मंचावर न येता, चारी बाजूंनी बुलेटप्रूफ काचेने सुरक्षित केलेल्या एका विशेष फिरत्या केबिनमधून चाहत्यांसमोर आले. अभिषेक बच्चनही सोबत या वेळी त्यांच्यासोबत मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हादेखील उपस्थित होता. बिग बींनी नेहमीप्रमाणे हात उंचावून, हात जोडून चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला असला, तरी या बुलेटप्रूफ काचेच्या केबिनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून नेटिझन्सकडून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘नमो बॉलिवूड सुरक्षा योजना’ जाहीर करा अमिताभ बच्चन यांच्या बुलेटप्रूफ केबिनवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि अमिताभ बच्चन यांच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “अमिताभ बच्चन आणि बॉलीवूडमधील इतर कलाकारांकरिता केंद्र सरकारने तातडीने ‘विशेष नमो बॉलिवूड जीवन सुरक्षा योजना’ जाहीर करावी, अशी आमची जाहीर मागणी आहे. या योजनेंतर्गत ‘दीवार’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला ‘बिल्ला क्रमांक ७८६’ चे वाटप करण्यात यावे, जेणेकरून ते सुरक्षित राहतील,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. जुन्या ट्वीट्सची करून दिली आठवण “2014 पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात जेव्हा पेट्रोलच्या दरात थोडी वाढ व्हायची किंवा रुपयाचे अवमूल्यन व्हायचे, तेव्हा अमिताभ बच्चन तत्परतेने उपरोधिक ट्वीट्स करायचे. आता देशात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना आणि स्वतः कलाकारांना बुलेटप्रूफ काचेच्या मागे लपावे लागत असताना, बिग बींनी ‘मोदी है तो मुमकिन है’ आणि ‘देश सुरक्षित हाथों में है’ असे एक तरी ट्वीट करून दाखवावे, अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे,” असे सावंत म्हणाले. बॉलीवूड गँगस्टरच्या रडारवर? गेल्या काही महिन्यांत मुंबईत सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना अंडरवर्ल्ड तसेच लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे सत्र सुरू आहे. अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराची घटना आणि दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमांनंतर बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार दहशतीच्या छायेत आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून अमिताभ बच्चन यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट मिळाल्यामुळे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने ‘जलसा’ बंगल्याभोवती चोवीस तास सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून, त्यांच्या कार्यालय आणि प्रवासाच्या मार्गावरही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. —————————————————————- हेही वाचा… माझ्याकडे चार नाही, अनेक ऑडिओ क्लिप्स: वेळ आल्यावर आणखी बॉम्ब फोडणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना थेट आणि इशारा दिला आहे. “माझ्याकडे फक्त चार ऑडिओ क्लिप्स नाहीत, तर अशा अनेक क्लिप्स आहेत. जर सरकारने आमच्याविरोधात सुरू असलेले हे षडयंत्र थांबवले नाही, तर मी लवकरच आणखी काही ऑडिओ बॉम्ब फोडणार आहे,” असा खळबळजनक इशारा जरांगे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *