![]()
राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये काही जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, उर्वरित जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतींचे निकाल आज स्पष्ट झाले असून, नव्या संचालकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने लक्षणीय जागा जिंकल्या आहेत, तर सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीने सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात यांच्या सहकार विकास पॅनलने मोठे यश मिळवले आहे. तिन्ही जिल्ह्यांतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी: सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल (एकूण विजयी उमेदवार): भाजप (एकूण ९ जागा): राष्ट्रवादी काँग्रेस (एकूण ८ जागा): शिवसेना (एकूण ४ जागा) अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक निकाल (महत्त्वाच्या १० जागा) विखे-थोरात (सहकार विकास पॅनल): निलेश लंके-सदाशिव लोखंडे (सहकार परिवर्तन पॅनल):
निलेश लंके (पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था) राम शिंदे प्रणित उमेदवार:
१. ज्योती शिंदे (कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था) अपक्ष:
१. संजीवनी शिंदे (अकोले विविध कार्यकारी सेवा संस्था) सांगली जिल्हा बँक निवडणूक निकाल (एकूण २१ जागा) सांगलीत २१ पैकी सत्ता स्थापनेसाठी ११ जागांची आवश्यकता असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीकडे बहुमताचा आकडा पार करण्याचे संख्याबळ आले आहे. काँग्रेस (एकूण ६ जागा): राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट (एकूण ५ जागा): भाजप (एकूण ५ जागा): शिवसेना – शिंदे गट (एकूण ३ जागा): राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (एक जागा): अपक्ष (एक जागा): या निकालांमुळे आता सहकार क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणांना वेग येणार असून, जिल्हा बँकांच्या कारभाराची दिशा स्पष्ट झाली आहे. ———————- संबंधित बातम्या वाचा.. सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल:शंभूराज देसाईंचा पाटणमध्ये विजय, भाजपला धक्का; जावळीत शिवेंद्रराजेंच्या समर्थकाची बाजी
राज्यातील सहकार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, पहिल्याच तासात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे जावळीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. सविस्तर वाचा अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक:खासदार नीलेश लंके विजयी; पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात विखे समर्थकाचा पराभव अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या उर्वरित 10 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहिला मोठा निकाल समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पारनेर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी विखे समर्थकांचा पराभव करत या प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली आहे. सविस्तर वाचा सांगली जिल्हा बँक निकाल: संजय पाटील यांच्याकडून सुमनताई पाटील यांचा पराभव, जतमध्ये गोपीचंद पडळकर विजयी
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दोन मतदारसंघांत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. तासगाव सोसायटी गटात माजी आमदार सुमनताई पाटील यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे, तर दुसरीकडे जत सोसायटी गटात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. सविस्तर वाचा
Source link
जिल्हा बँक निवडणूक निकाल जाहीर:साताऱ्यात भाजपचा डंका, सांगलीत महाविकास आघाडीचे वर्चस्व; अहिल्यानगरसह तिन्ही जिल्ह्यांतील विजयी उमेदवारांची यादी