Headlines

Kishori Pednekar Slams BJP Over Diya Mirza Controversy


मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिवाळी प्रदूषण जनजागृती मोहिमेतून अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवल्याच्या प्रकरणावरून राजकीय वाद चांगलाच उफाळला आहे. भाजप आमदार अमित साटम यांच्या आक्षेपानंतर आणि महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झाला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्या

.

महापौर रितू तावडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना पेडणेकर म्हणाल्या की, “नागरी समस्या सोडून जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्या महापौरांनी आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचे रूपांतर थेट ‘सर्कस’मध्ये केले असून संपूर्ण कारभार विदूषकासारखा चालवला जात आहे.”

केवळ ‘मिर्झा’ नावावरून राजकारण

दिया मिर्झाच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पेडणेकर यांनी आरसा दाखवला. “मुंबई हे देशाचे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे आणि भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र दिया मिर्झाच्या नावापुढे ‘मिर्झा’ असल्याने केवळ धार्मिक द्वेषापोटी त्यांच्यावर चिखलफेक केली गेली. वस्तुस्थिती अशी आहे की दिया मिर्झाची आई हिंदू आहे आणि स्वतः शिंदेसेनेच्या उपमहापौरांनीही दिया मिर्झाची पाठराखण केली आहे.”

देशाचे नाव उज्ज्वल करणारी अभिनेत्री

“दिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकून भारताचे नाव जगभरात मोठे केले आहे. भाजपचेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिया मिर्झाला प्रतिष्ठित ‘मदर टेरेसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. मग तेव्हा ती देशद्रोही नव्हती का? सरकारविरोधात किंवा अन्यायाविरोधात बोलणारा प्रत्येक नागरिक देशद्रोही ठरतो का?”

हक्कासाठी आवाज उठवणे गुन्हा नाही

“शासनाच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. स्वतःच्या जन्मगावी म्हणजे हैदराबादमध्ये किंवा देशात जर तिने जनहितासाठी आवाज उठवला, तर तिला देशद्रोही ठरवण्याचे पाप भाजप करत आहे.”

घाबरून व्हिडीओ डिलीट करणारी पालिका लाचार

महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना माजी महापौर म्हणाल्या, “सोशल मीडियावर ट्रोलिंग झाले म्हणून व्हिडीओ डिलीट केला, असे महापालिका प्रशासन सांगत आहे. मुळात हे ट्रोलर्स कोण आहेत? हे सगळे भाजपच्याच आयटी सेलचे ट्रोलर्स आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयानेच सेलिब्रिटींच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सांगितले होते. संदेश दूत म्हणून पालिकेने स्वतः अधिकृत पत्र देऊन दिलेला व्हिडीओ भाजपच्या दबावाखाली हटवणे ही प्रशासनाची अक्षम्य चूक आहे.”

स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवला

“गेली 25 वर्षे आम्ही मुंबई महापालिकेत काम केले, सत्ता चालवली; परंतु पक्षाला किंवा प्रशासनाला मान खाली घालावी लागेल असे कृत्य कधीही केले नाही. भाजपचे नेते सांगतील तसे जर पालिका वागणार असेल, तर या संस्थेची स्वायत्तता शिल्लक राहिलेली नाही.”

नागरी समस्या सोडून जाती-धर्मावर फोकस

मुंबईच्या विद्यमान महापौर रितू तावडे यांच्या विधानांवर पेडणेकर यांनी अत्यंत बोचरी टीका केली. “अमित साटम आणि महापौर रितू तावडे हे दोघेही महापालिकेचे वाचाळवीर झाले आहेत. कामातून मोठे होता येत नसल्याने रोज वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कोणत्याही महापौरांना पदावर आल्यानंतर प्रशासनाची धुरा सांभाळायची असते, पण यांनी पालिकेची सर्कस करून ठेवली आहे.”

ब्लॅकलिस्ट करण्याचा अधिकार कोणाचा?

“महापौर सांगतात मी दिया मिर्झाला ब्लॅकलिस्ट करणार! मुळात महापौरांना असा कायदेशीर अधिकार आहे का? स्वतः नापास झालेल्या महापौरांना जगभरातून दूषणे मिळत आहेत. ज्या व्यक्तीने पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विनामूल्य व्हिडीओ बनवून दिला, तिचा जाहीर अपमान केला जात आहे.”

विरोधी पक्ष आणि गटनेत्यांना डावलले

“महापालिकेत विरोधी पक्षनेते किंवा गटनेत्यांची साधी बैठक घेतली जात नाही. सर्व निर्णय मनमानी पद्धतीने घेतले जात आहेत आणि आता प्रशासनाला दोष देऊन स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

लाल दिवा अन् बंगल्याच्या नूतनीकरणावर कोट्यवधींची उधळपट्टी

महापौरांच्या आधीच्या वादग्रस्त निर्णयांची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, “महापौरपदावर बसल्यापासून रितू तावडे यांनी काय केले? आधी स्वतःच्या गाडीवर बेकायदेशीर लाल दिवा मिळावा म्हणून हट्ट धरला, त्यावर चहूबाजूंनी टीका झाली. नंतर महापौरांच्या ऐतिहासिक हेरिटेज बंगल्याचे कॉर्पोरेट लूकच्या नावाखाली नूतनीकरण करण्यासाठी जनतेच्या कराचे कोट्यवधी रुपये उधळण्याचा घाट घातला.”

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष

“मुंबईकरांना स्वच्छ पिण्याचे पाणी, खड्डेमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त हवा आणि उत्तम आरोग्य सेवा देणे हे महापौरांचे आद्यकर्तव्य असायला हवे. मात्र, मूलभूत नागरी समस्या सोडवण्याऐवजी भाजपचा जातीय अजेंडा राबवण्यातच महापौर धन्यता मानत आहेत,” असा घणाघाती आरोप किशोरी पेडणेकर यांनी शेवटी केला.

————————————————————————————-

हेही वाचा…

दिया मिर्झाचा दिवाळीचा व्हिडिओ हटवल्याने हायकोर्ट नाराज: म्हटले- भारत धर्मनिरपेक्ष देश; BMC ला पुन्हा अपलोड करण्याचे आदेश; भाजप नेत्यांनी घेतला होता आक्षेप

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्याला कोणताही वेगळा रंग देऊ नये. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने म्हटले की, दिया मिर्झाने न्यायालयाच्या निर्देशांनुसार जनजागृतीचा व्हिडिओ तयार केला होता. काही नेत्यांच्या टिप्पण्या योग्य नव्हत्या. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.