![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला कापसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यंदा दुष्काळामुळे हेक्टरी उत्पादन ४ क्विंटलवर आले असून, सुरुवातीला बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या कापसाला ९,५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. मात्र, केंद्र शासनाने परदेशी कापसावरील ११ टक्के आयात शुल्कमाफीला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देत ती ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवल्याने कापसाचे दर १ हजार रुपयांनी घसरून ८,५०० वर आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ६०३ हेक्टरवर कपाशीची लागवड असून, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन आणि प्रतवारी घसरली आहे. त्यात स्वस्त परदेशी कापसाच्या आयातीमुळे स्थानिक कापसाच्या दरवाढीच्या आशा धूसर झाल्या आहेत. प्रतिहेक्टर चार क्विंटल उत्पादन आणि प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचा दरदबाव गृहीत धरल्यास जिल्ह्यात कापसाच्या संभाव्य विक्रीमूल्यात ११३ कोटी रुपयांची घट होऊ शकते, असे गणित व्यापारी व जिनिंग उद्योग क्षेत्रातून मांडण्यात येत आहे. जिल्ह्यातील संभाव्य ११.३० लाख क्विंटल कापसापासून ३३ टक्के रुई उतारा गृहीत धरल्यास ७४,५०० गाठी तयार होऊ शकतात. जिनिंग उद्योगाच्या गणितानुसार, प्रतिगाठी एक हजारांचा दरदबाव आल्यास रुईच्या संभाव्य विक्रीमूल्यात ७.४५ कोटी रुपयांची घट होऊ शकते. जिल्ह्यातील २.८२ लाख हेक्टरवर प्रतिहेक्टर चार क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास ११.३० लाख क्विंटल कापूस बाजारात येऊ शकतो. व्यापारी व जिनिंग उद्योगाच्या अंदाजानुसार, प्रतिक्विंटल ५०० रुपयांचा दरदबाव निर्माण झाल्यास विक्रीमूल्यात ५६.५० कोटी, तर एक हजार रुपयांचा दबाव आल्यास ११३ कोटी रुपयांची घट होऊ शकते. Ã शुल्कमाफीच्या मुदतवाढीमुळे कापसाच्या दराला निश्चितच मोठा फटका बसण्याची भीती आहे. चांगला भाव मिळण्यासाठी परदेशात कापूस निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि आवश्यक शुल्क सवलतीचा विचार करणे गरजेचे आहे. – दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर शांतीलाल पहाडे, अध्यक्ष, भाग्योदय जिनिंग उद्योग, वैजापूर आयात शुल्कमाफीच्या मुदतवाढीमुळे कापसाच्या दरावर दबाव राहण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन आणि प्रतवारी घटल्याने जिनिंग उद्योगाचे गणित आधीच बिघडले आहे. परदेशी कापूस स्वस्त उपलब्ध झाल्यास रुईच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो.
Source link
11% आयात शुल्कास 31 डिसेंबरची मुदतवाढ; कापूस 1 हजाराने घसरला:सुरुवातीस 9,500 मिळणारा भाव 8,500 रुपयांवर