![]()
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालक मंडळावरील अपात्रता कारवाईप्रकरणी सोलापुरातील चार नेत्यांनी पुण्यात विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. यामध्ये माजी आमदार दिलीप माने, संजयमामा शिंदे, माजी संचालक सुरेश हसापुरे आणि बबनराव अवताडे या चार जणांचा समावेश आहे. याप्रकरणी येत्या ६ तारखेला पुण्यात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सर्वच नेत्यांनी आपली पुढील पिढी रिंगणात उतरवली आहे. त्यामुळे यांचा फारसा फरक पडणार नाही. मात्र आपली पुढची पिढी बँकेच्या राजकारणात दिसली. नियमाला अधीन राहून जर अर्ज बाद ठरण्याची ठरेल याची भीती होती. मात्र आपला वारसदार नेमण्याची तयारीही मातब्बर नेत्यांनी करून ठेवली होती. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातून दिलीप माने यांनी पुत्र डॉ. पृथ्वीराज यांचा अर्ज भरला आहे. माढा तालुक्यात संजयमामा शिंदे यांनी पुत्र यशवंत शिंदे यांचा अर्ज सोसायटी मतदारसंघातून दाखल केला आहे. तर मोहोळ तालुक्यातून राजन पाटील यांनी पुत्र विक्रांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातून बबनराव अवताडे यांच्या कुटुंबातून सुशील व सिध्देश्वर या दोघांचेही अर्ज मंजूर झाले आहेत. दक्षिण सोलापूरमधून सुरेश हसापुरे यांनी आपल्या जागी मुलगा श्रीदीप यांना रिंगणात उतरवले आहे. करमाळ्यातून जयवंतराव जगताप यांनी पुत्र शंभूराजे जगताप यांंना निवडणूक आखाड्यात उतरवले आहे. कलम ८८ च्या नोटीससंदर्भात रक्कम भरण्याची आमची पूर्ण तयारी होती. तसे पत्रही आम्ही दिले होते. मात्र, बँकेनेच आमच्याकडून पैसे घेतले नाहीत, त्यामुळे यासाठी आम्हाला जबाबदार धरून आमच्यावर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. कलम ११० (अ) अन्वये झालेल्या कारवाईबाबत अपीलकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, या कारवाईचा आदेश निघण्यापूर्वीच आम्ही आमचे राजीनामे दिले होते. आमच्या राजीनाम्याला मंजुरी मिळणे बाकी होते. त्यामुळे यापुढील घडामोडींसाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही आणि अपात्रतेचा नियम लागू होत नाही. दिलीप माने (माजी अध्यक्ष) ११ कोटी ६४ लाख संजयमामा शिंदे (माजी अध्यक्ष) ९ कोटी ८५ लाख बबनराव अवताडे (माजी उपाध्यक्ष) ११ कोटी ४५ लाख सुरेश हसापुरे (१० वर्षे संचालक) ८ कोटी ३ लाख
Source link