Headlines

मलकापुरात उसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात:उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून 60 वर्षीय महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर




कराडजवळील मलकापूर शहरात उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन एक भीषण दुर्घटना घडली आहे. मलकापुरातील ढेबेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली असून, पलटी झालेल्या ट्रॉलीखाली दोन दुचाकींसह दोन ते तीन जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उसाच्या ढिगाऱ्यातून पाटण तालुक्यातील एका दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्यादरम्यान उसाच्या ट्रॉलीखाली आई आणि मुलगा दबले. उसाचा प्रचंड ढिगारा अंगावर कोसळल्याने आईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मयत महिलेचे नाव मालन मोहन सुतार (वय 60, रा. काढणे, ता. पाटण) असे असून, जखमी मुलगा यशवंत मोहन सुतार (वय 28, रा. काढणे, ता. पाटण) याच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, ट्रॉलीखाली किंवा उसाच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी व्यक्ती अडकली आहे का, याचा शोध कराड वाहतूक पोलिस आणि स्थानिक नागरिकांकडून सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, आईच्या दुर्दैवी मृत्यूने काढणे परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वृत्त वाचा

आजरा-आंबोली मार्गावर भीषण अपघात:17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दोन मित्र बचावले
परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तीन महाविद्यालयीन मित्रांवर काळाने घाला घातला. आजरा-आंबोली मार्गावर गवसे ते धनगरमोळा दरम्यान होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील झाडावर आदळून चारीत कोसळली. या दुर्घटनेत 17 वर्षीय समर्थ पांडुरंग पांगम याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र संस्कार अमित सुतार गंभीर जखमी झाला आहे. तिसरा मित्र प्रथमेश दुंडाप्पा वाजंत्री सुदैवाने बचावला. परीक्षेचा शेवट आनंदात साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मित्रांच्या सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *