Headlines

Vijay Wadettiwar Slams Gokul Milk Politics; Alleges Backdoor Power Grab


दोन लाख रुपये कर्ज असलेल्या एकाही शेतकऱ्याला सरकारने कर्जमाफी दिलेली नाही. ज्यांचे कर्ज सव्वा लाख, 90 हजार, 80 हजार किंवा 60 हजार रुपये आहे, त्यांचीच कर्जमाफी करण्यात आली आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा आकडा फुगवण्यात आला. ज्यांचे कर्ज दीड लाखांपेक

.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपला कौल दिलेला आहे. मात्र सत्तेच्या जोरावर निवडून आलेल्या संचालकांना बाजूला ठेवण्याचे, त्यांना परराज्यात नेण्याचे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा खेळ बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगावे की, संचालकांना बाहेर का नेण्यात आले? मतदानाचा अधिकार असलेल्या संचालकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार कशासाठी? 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व निवडून आलेल्या संचालकांना उपस्थित राहू द्या. बहुमताच्या आधारावर अध्यक्ष निवडला जाऊ द्या. मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.

सभासदांच्या कौलाचा अनादर खपवून घेणार नाही

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गोकुळच्या लढाईत आम्ही सतेज पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. सभासदांनी दिलेल्या कौलाचा अनादर आम्ही खपवून घेणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. महायुतीकडून लोकशाहीच्या तत्त्वांनाच हरताळ फासला जात आहे. जनतेने आणि दूध उत्पादक सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताचा अनादर करून संस्थेवर ताबा मिळवण्याचा कुटिल डाव आखला जात आहे. हा केवळ गोकुळ दूध संघाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्राची स्वायत्तता आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.

हा तर रावणांचा मोर्चा

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकशाहीची हत्या करणारे सत्ताधारी आता लोकशाही वाचवा म्हणून मोर्चा काढत आहेत. सत्तेत बसून अराजकता माजवणारे काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. हा तर रावणांचा मोर्चा आहे असा टोला वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लावला.

बहुमत असणाऱ्या संचालकांना बाहेर का पाठवले?

गोकुळ निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी त्यांचे संचालक तिथे हजर का राहू दिले नाहीत, त्यांना बाहेर का पाठवण्यात आले होते? असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले की, 13 हा आकडा बहुमताचा आहे आणि त्यांच्यापेक्षा एक सदस्य जास्त म्हणजे स्पष्ट बहुमत झाले. मात्र, जनतेने नाकारलेल्यांना मागच्या दाराने प्रवेश देण्याचा प्रयत्न गोकुळमध्ये सुरू आहे. तिथे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू.

देशाच्या एकात्मतेसाठी घातक

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, देशात धार्मिक तेढ निर्माण करून मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. दिया मिर्झा यांनी मांडलेल्या भूमिकेवर त्यांच्या आडनावाचा आधार घेऊन टीका केली गेली आणि त्यांचा व्हिडीओ काढण्यात आला. एखाद्या व्यक्तीच्या आडनावावरून तिची भूमिका ठरवणे आणि हिंदू-मुस्लिम असा भेद निर्माण करणे ही देशाच्या एकात्मतेसाठी घातक बाब आहे. राहुल गांधी सत्य बोलत आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली जाते, मात्र देशात अराजकता कोण निर्माण करत आहे, याचे उत्तर भाजपने द्यावे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हा दुटप्पीपणा कशासाठी?

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर आता भाजपमधील धर्मरक्षक कुठे लपून बसले आहेत? त्यावेळी देव, धर्म आणि हिंदूंच्या भावना दिसल्या नाहीत का? दुसऱ्यांनी काही बोलले की अंगावर धावून जायचे आणि या भोंदू लोकांनी देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली की गप्प बसायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी? प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे मत मिळवण्याचे किंवा देणग्या गोळा करण्याचे साधन नाहीत. धर्माचा वापर सत्तेसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी करू नये अशी सडकून टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केली. हे ही वृत्त वाचा राहुल गांधींना विषयच समजलेला नाही:पेचप्रसंग सोडवण्यासाठी शासनाचा निर्णय, गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला आता महायुती सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधींना गोकुळचा विषयच समजलेला नाही. गोकुळमध्ये मतांची चोरी झालेली नसून, पोटनियमांमुळे निर्माण झालेला पेचप्रसंग (डेडलॉक) सोडवण्यासाठी आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असा दावा हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.