Headlines

कुंदेवाडीत शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद:कृषी निविष्ठांचे वितरण व मृदा आरोग्य, गहू लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन



आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मृदा आरोग्य संवर्धन, संवर्धित शेती पद्धती आणि सुधारित गहू लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी येथे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (निफाड) आणि महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेत बचाव अभियानांतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम व कृषी निविष्ठा वितरण कार्यक्रम पार पडला. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रेरणेने तसेच संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि शिक्षण संचालक डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे मृद विज्ञान विभागप्रमुख डॉ. भीमराव कांबळे होते. तांत्रिक सत्रात डॉ. भीमराव कांबळे यांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन, डॉ. उल्हास सुर्वे यांनी संवर्धित शेती पद्धती, तर कृषी संशोधन केंद्र, निफाडचे गहू विशेषज्ञ डॉ. भालचंद्र म्हस्के यांनी गहू लागवड तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद सत्रात शेतकऱ्यांनी शेतीविषयक समस्या आणि अनुभव मांडले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रक्षेत्र भेटीदरम्यान संवर्धित शेतीसाठी कृषी यंत्रे व अवजारांच्या साहाय्याने पेरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी डॉ. अविनाश कोळगे, डॉ. अनिल जगदने, डॉ. रवींद्र पाटील,भटू पाटील, आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *