![]()
अल्पसंख्याकांसह गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विवाह सोहळे खासगी मंगल कार्यालयांच्या वाढत्या खर्चामुळे अनेकदा आर्थिक अडचणीत येतात. अशा कुटुंबांसाठी हा शादीखाना वरदान ठरेल. दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असलेली ही वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून भव्य व सुसज्ज शादीखाना (सांस्कृतिक भवन) उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या हस्ते पूजन करून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजान शेख यांची होती. या नूतन शादीखान्यामध्ये विवाह सोहळ्यांसाठी भव्य सभागृह, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, आधुनिक स्वयंपाकघर, वधू-वरांसाठी सुसज्ज खोल्या तसेच वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक मुस्ताक शेख यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे, नगरसेविका शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख, नगरसेवक प्रमोद डोके, नगरसेविका शहनाज तलफदार, नगरसेवक सतीश काळे, कुंदन धोत्रे, अझरुद्दीन कुरेशी, संतोष सुरवसे, उद्योजक खाजाभाई शेख, यशवंत गुंड, हेमंत गरड, डॉ. वसीम शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तलफदारकडून स्वमालकीची जागा दान महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्याकडे शहरातील नागरिकांसाठी शादी खाना करावा अशी मागणी मी आणि म. शौकत तलफदार यांनी लेखी मागणी केली होती. नगरसेविका शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख, नगरसेविका शहनाज तलफदार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला. हा शादीखाना करण्यासाठी नगरसेविका शहनाज तलफदार आणि एजाज तलफदार यांनी स्वमालकीची जागा दान दिली. याबद्दल माजी नगरसेवक मुस्ताक शेख यांनी आभार मानले.
Source link
मोहोळमध्ये सुसज्ज शादीखान्याचे भूमिपूजन:अल्पसंख्याकांसह सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा; राजन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन