![]()
राष्ट्रीयीकृत बँकांकडून सिव्हिल रिपोर्टच्या नावाखाली पीक कर्ज नाकारले जात असल्याच्या निषेधार्थ आज भारतीय स्टेट बँक, शाखा भोकरदन येथे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. “शेतकऱ्यांची दिवाळी बँकेच्या दारी” या अनोख्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रमुख 8 मागण्या या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तहसीलदार, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत.. भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक नचिकेत देशपांडे यांना निवेदन देताना नारायण लोखंडे, विकास जाधव आणि शेतकरी उपस्थित होते. दुष्काळ परिस्थितीत कर्ज न मिळाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची कामे मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी केले आहे. ———— हेही वाचा.. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय देण्याचे कारस्थान जलील यांचेच:मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप, म्हणाले – त्यांना जेलमध्ये जावेच लागणार!
निदा खान हिला नाशिकमधून पळवून मुंब्रा येथे घेऊन जाणे, तेथून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणे आणि जवळपास 35 दिवस तिच्यासह तिच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था करण्यामागे मुख्य आरोपी इम्तियाज जलील हेच आहेत. त्यांचा जो नगरसेवक आहे, तो केवळ एक मोहरा असून हे सर्व कारस्थान इम्तियाज जलील यांचेच आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आता त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे, असा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
भोकरदनमध्ये बँकेसमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन:सातबाऱ्यावरील बोजा, सिव्हिल रिपोर्टने अडवणूक थांबवा, 8 मागण्यांचे निवेदन