Headlines

पत्नीची छेड काढल्याच्या रागातून तिघांनी केला कंत्राटदाराचा खून:करमाड येथील खून प्रकरणाचा उलगडा, एक संशयित आरोपी फरार




पत्नीची छेड काढल्याचा राग मनात धरून तिघांनी कट रचत कंत्राटदाराचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार करमाड एमआयडीसीत उघडकीस आला आहे. कंत्राटदार इंद्रजित बाबूराव खुळे (५१, रा. गोलटगाव) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून, उत्तर प्रदेशातून दोघांना अटक केली आहे. मुख्य संशयित ऋषभ श्रीवास्तव फरार आहे. प्रियम कुशवाह हा पत्नीसह कामाच्या शोधात आला होता. खुळे यांनी त्याच्या पत्नीची छेड काढल्याचे तिने प्रियमला सांगितले. याचा राग मनात प्रियमने साथीदारांसह खुळे यांना करमाड एमआयडीसीतील प्लॉटकडे नेले. तेथे लोखंडी पाइप आणि सिमेंटच्या विटांनी डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चेंबरमध्ये टाकून पेट्रोल ओतून जाळल्याचे तपासात समोर आले आहे. अद्याप एक संशयित फरार असून, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, प्रशांत स्वामी, पूजा नागरे व सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. धरून प्रियमने साथीदारांसह खुळे यांना प्लॉटकडे नेले. तेथे त्यांची हत्या केली. पोलिसांनी तिर्वा येथून प्रियम विरेंद्रसिंह कुशवाह (१९) आणि रवी आसाराम कुशवाह (२१) यांना अटक केली. आरोपींनी ऋषभ श्रीवास्तवच्या साथीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस अधिकारी गोकुळ ठाकूर, नितीन नलावडे, महेश घुगे यांनी आरोपींना अटक केली. पेट्रोल ओतून जाळले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *