![]()
दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, तसेच या आनंदाचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून लासूरगाव येथील श्रीदेवी दाक्षायणी मंदिराच्या वतीने एक हजार गरजू महिलांना साड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी हा स्तुत्य आणि कौतुकास्पद सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वैजापूर तालुक्यातील भानवाडी, शहाजतपूर, जळगाव, हडसपिंपळगाव आदी पाच गावांतील गरीब कुटुंबांमधील महिला, परिसरातील आदिवासी वस्तीतील गरजू महिला तसेच कष्टाचे काम करणाऱ्या वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबांतील महिलांना या प्रसंगी साड्यांची भेट देण्यात आली. नवरात्रोत्सव आणि वार्षिक यात्रेच्या काळात देश-विदेशातून आणि विविध राज्यांतील भाविकांकडून देवी दाक्षायणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्यांचे संकलन करून त्यांचे संकलित स्वरूप गरजू महिलांमध्ये वाटप केले जाते. तहसीलदार सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही मायेची भेट मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. उपस्थित ज्येष्ठ महिलांनी तहसीलदार सावंत यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक संभाजी जगताप, मंदिराचे सहव्यवस्थापक संतोष शेलार, पोलिस पाटील राजेंद्र मोडके, पोलिस पाटील कारभारी निघोटे, राजू भाडाईत, सुनील सूर्यवंशी, बळीराम तांबे, आबासाहेब मोडके, बबन हजारे, राजेंद्र नवले यांच्यासह नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सव आणि वार्षिक यात्रेच्या काळात देश-विदेशातून आणि विविध राज्यांतील भाविकांकडून देवी दाक्षायणी मातेला अर्पण करण्यात आलेल्या साड्यांचे संकलन करून त्यांचे संकलित स्वरूप गरजू महिलांमध्ये वाटप केले जाते. तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षीही हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र लासूरगाव येथील श्रीदेवी दाक्षायणी मातेच्या मंदिरात प्रत्येक वर्षी यात्रा आणि नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाच आरतीचा मान देण्याची संकल्पना सुरुवातीपासून राबवली जात आहे. व्हीआयपी संस्कृती बाजूला सारून थेट दर्शन रांगेतील सर्वसामान्य भाविकांना हा बहुमान मिळवून दिला जातो. रांगेतील भाविकांना दिला आरतीचा मान
Source link
दाक्षायणी देवी मंदिरातर्फे 1 हजार साड्यांचे वितरण:सामाजिक उपक्रमाचे चौथे वर्ष, वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांचा पुढाकार