Headlines

शेवगाव-पैठण मार्गावर ट्रक अन् दुचाकीची समोरासमोर धडक:दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या‎ तिघांचा जागीच मृत्यू




दिवाळीच्या खरेदीसाठी शहराकडे निघालेल्या तीन तरुण मित्रांवर काळाने भीषण घाला घातल्याची हृदयद्रावक घटना शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील घोटण फाट्यानजीक घडली. या अपघातात खानापूर (ता. शेवगाव) येथील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण शेवगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. खानापूर येथील तीन मित्र दिवाळीच्या खरेदीसाठी दुचाकीवरून शेवगावकडे निघाले होते. त्याच वेळी शेवगावकडून पैठणच्या दिशेने उसाची वाहतूक करणारा एक रिकामा ट्रक भरधाव वेगाने जात होता. घोटण शिवारात ट्रॅकचालकाने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही तरुण रस्त्यावरून दूरवर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ओंकार भाऊसाहेब जगधने (वय 19), अमर रवींद्र जगधने (वय 17) आणि रोहित रमेश धनुरे (वय 17, तिघे रा. खानापूर) असे मृत्यमुखी पडलेल्या तरुणांचे नाव आहे. मृत झालेले तिन्ही तरुण अतिशय गरीब कुटुंबातील होते. सणाच्या आदल्या दिवशीच खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच खानापूर गावावर व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. हे ही वृत्त वाचा महाराष्ट्रात रोज 8 शेतकऱ्यांची आत्महत्या, हा आकडा भयानक:नेत्यांच्या फायद्यासाठी डेटा सेंटर लादू नका, रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
एआय डेटा सेंटरमुळे ट्रम्प यांच्या पक्षाचा अमेरिकेत पराभव झाला आहे. तिथल्या लोकांनी सुद्धा या प्रकल्पाला नाकारले आहे. हा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी, लाईटचा वापर केला जातो, आणि त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी कर्नाटकमध्ये गेले आहे. इथे लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणार नाही. ऊजणीतच पाणी राहिले नाही तर लोकांना पाणी मिळणार कुठून? असा सवाल पवारांनी केला आहे. केवळ नेत्यांना सपोर्ट करण्यासाठी एआय डेटा सेंटरचे समर्थन जर भाजपचे नेते करत असतील तर ते फार घातक आहे. सोलापूरचा एक जण डेंटा सेंटरमध्ये गुंतवणूकदार असून सर्व नेते त्यांच्या जवळ आहेत. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *