![]()
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील शासकीय संचालकांच्या नियुक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारने गोकुळमध्ये शासकीय संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये असा पोरकटपणा करण्याची गरज नव्हती, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. लोकशाही प्रक्रियेतून महायुतीचा पराभव झाला होता आणि गोकुळची सत्ता समविचारी आघाडीकडे गेली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा आदर करावा; 12 संचालकांना बैठकीला पाठवावे गोकुळमधील सत्तासंघर्षावर बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लोकशाही प्रक्रियेचा आदर करण्याचा सल्ला दिला. निवडणुकीत जो कौल मिळाला आहे, तो स्वीकारणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, सरकारने आपल्या 12 संचालकांना बैठकीला जाण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आता लोकशाहीचा आदर करून या 12 संचालकांना गोकुळच्या बैठकीला पाठवून द्यावे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तांतराच्या राजकारणाचाही संदर्भ दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेत फूट पाडली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, विरोधी पक्षांनी लोकशाहीने दिलेला कौल मान्य नाही, अशी भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे गोकुळच्या बाबतीतही लोकशाहीने दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. संजय राऊत यांचाही फडणवीसांवर हल्लाबोल दरम्यान, गोकुळमधील शासकीय संचालकांच्या नियुक्तीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांना या प्रकरणात रस नसता, तर बेकायदेशीर संचालक नियुक्त करण्याची वेळ आली नसती, असा आरोप राऊत यांनी केला. पराभूत झालेल्या हसन मुश्रीफ आणि महाडिक यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. गोकुळमध्ये बहुमताच्या आधारे अध्यक्ष निवडला गेला पाहिजे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल निवडणुकीत विजयी झाले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांच्या पॅनेलमधील दोन विजयी जागा हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये टाकल्या नसत्या, तर सतेज पाटील यांच्या पॅनेलला 15 जागा मिळाल्या असत्या, असे राऊत यांनी म्हटले. सरकारकडून लोकशाहीचा कौल पायदळी तुडवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोकुळमध्ये सरकार रडीचा डाव खेळत आहे; रोहित पवारांची टीका गोकुळच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली आहे. गोकुळमध्ये सरकार रडीचा डाव खेळत असल्याचे म्हणत त्यांनी शासकीय संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. लोकशाहीने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना बाजूला ठेवून अधिकाऱ्यांना तिथे बसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबतही सूचक विधान केले. एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला विरोध केल्याचे समजले असून, कदाचित ते या भूमिकेला पाठिंबाही देतील, असे ते म्हणाले. कोल्हापुरातील नागरिक आणि दूध उत्पादक या निर्णयाविरोधात जो लढा देत आहेत, तो केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. उद्या कोल्हापुरात मोठे आंदोलन गोकुळमधील शासकीय संचालकांच्या नियुक्तीविरोधात कोल्हापुरात उद्या मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळमधील संचालक नियुक्तीचा मुद्दा आता केवळ सहकारी दूध संघापुरता मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरत आहे. राजू शेट्टी, संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… 100 मीटरवर नेते, पण कार्यक्रमाला दांडी!:मिनाक्षी शिंदेंना डावलल्याची ठाण्यात चर्चा; दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील गंभीर आरोपांनंतर शिंदे गटाच्या आक्रमक नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे सध्या मोठ्या राजकीय संकटात सापडले आहेत. ठाण्यातील एक शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनाक्षी शिंदे यांना आता स्वपक्षाकडूनच एकाकी पाडले जात असल्याचे चित्र आहे. संपूर्ण पक्षाने त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचा प्रत्यय रविवारी ठाण्यात आयोजित केलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात स्पष्टपणे दिसून आला. सविस्तर वाचा….
Source link
गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांनी पोरकटपणा करण्याची गरज नव्हती:राजू शेट्टींचा फडणवीसांवर निशाणा, 12 संचालकांना बैठकीला पाठवण्याचा सल्ला