![]()
जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकलासपूर शिवारात सोमवारी ९ नोव्हेंबरला दुपारी ३.१५ वाजता ३.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या नोंदीनंतर शासकीय यंत्रणेकडून कारवाई सुरू करण्यात आली. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता जास्त नसल्याने आणि त्याचा केंद्रबिंदू या परिसरातील शेतात असल्याने कुठलीही जीवीत व वित्त हानी झाली नाही. दरम्यान भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यवतमाळ यांच्यामार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित महसूल व स्थानिक प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे. या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही.
Source link
यवतमाळ जिल्ह्यात 3.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचा साैम्य धक्का:कळंब तालुक्यात एकलासपूर शिवारात केंद्रबिंदू