Headlines

माणुसकीची दिवाळी:हरसूल परिसरात स्वयंसेवी संस्थांकडून फराळ, कपडे व शैक्षणिक साहित्य वाटप, तोरंगण, वाहनदरी माचीपाडा कामतपाडा, ठाणापाड्यात वस्तुंची भेट




दिवाळीनिमित्त हरसुल व परिसरातील अनेक गावांमध्ये नाशिक येथील दानशूर संस्थाकडून दिवाळीची भेट देत अनोख्या पद्धतीने शेतकऱ्यांसोबत माणुसकीची दिवाळी साजरी करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तसेच सालाबादाप्रमाणे नाशिक व परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी हरसुल परिसरातील गावांमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळी फराळासोबत शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग स्वेटरची मदत करत माणुसकीची दिवाळी खेड्यांमध्ये साजरी केली. तोरंगण वाहनदरी येथे एकनिष्ठ फाउंडेशनने, खैराई किल्ल्यावरील माचीपाडा व जांभूळपाडा येथे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर संस्था कामतपाडा येथे एज्युकेशन ग्रुप स्कूल बॅग व स्वेटर विद्यार्थ्यांना वाटप केले. हिवाळी, काथवडपाडा, ठाणापाडा येथे गिव संस्थेकडनं किराणा कपडे ची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली. विशेष म्हणजे खैराईकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा येथे रास्ता नसताना वाइल्ड लाईफ फोटोग्राफर संस्थेने किराणा कपडे व खाऊचे ओझे स्वतः वरपर्यंत पोहोचवून वाटप केले. वनराई बंधाऱ्यासाठी आमदारांचे ग्रामस्थांसोबत श्रमदान दिवाळी फराळ वाटपासाठी गेले असता थेट शेतकऱ्यांसोबत वनराई बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. व श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये बांधावर दिवाळी फराळचे आस्वाद घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *