Headlines

खंडाळा गावची लोकसंख्या 20 हजार; ग्रामस्थांची केवळ 3 टँकरवर बोळवण:ग्रामपंचायतीकडून 35 हजार लिटर क्षमतेच्या 5 टँकरचा दिला प्रस्ताव



वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी खंडाळा ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २० ते २५ हजारांच्या आसपास आहे. या वर्षी परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. सध्या परिसरातील पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. शासनाकडे ५ टँकरचा प्रस्ताव दाखल केला होता.

.

खंडाळा गावांतील भीषण पाणीटंचाई आणि टँकरची मागणी याबाबत दिव्य मराठीने सातत्याने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत अखेर पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले असून २८ ऑक्टोबर बुधवार रोजी तातडीने पाणीपुरवठा स्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व तातडीने टॅँकरने गावाला पाणी पुरवठा

करण्यासाठी शासनाकडे ५ टँकरचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, ३ टँकरच मंजूर करून गावची बोळवण केली आहे. त्यामुळे या गावात आजही पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे आधीच्या प्रस्तावाने टँकरची संख्या वाढवून गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

सन मार्च २०१५ पाण्याची अशीच परिस्थिती असल्याने खंडाळा गावात १४ टँकर शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे गावात दर सहा दिवसांत एकदा पाणी येत असल्याने पाण्याची टंचाई भासली नाही. परंतु यंदा शासनाच्या वतीने २० हजार लोकसंख्या असलेल्या गावात ३ टँकर मंजूर करून शासनाने गावाची थट्टा केली असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. तरी शासनाने अधिकाधिक खंडाळा गावास टँकर मंजूर करून महिला व चिमुकल्यांची होणारी हेळसांड थांबवावी,अशी मागणी होत आहे.

शासनाच्या वतीने खंडाळा गावास २४ हजार लिटरचे ३ टँकर मंजूर केले. त्याची प्रती टँकर दोन खेपा केल्या जातात. त्यामुळे एक लाख ४४ हजार लिटर पाणी पुरवठा होतो. गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी ३ लाख ५० हजार लिटरची एक झोन साठी दोन वेळा भरावी लागते. परंतु सध्याचे टँकर बघता एक टाकी भरण्यासाठी दोन दिवसा पेक्षा अधिक वेळ लागला असल्याने संपूर्ण गावाला २५ दिवसा नंतरही पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यात आझादनगर भागातील १ लाख ५० हजार क्षमतेची पाण्याची टाकी असून या भागात पुरवठा करणे साठी तीन वेळा भरावी लागते.

महिन्याला दीड हजार खर्चून पाणी घेण्याची आली वेळ महिन्यापासून गावाला ३ टँकर मंजूर झाले म्हणून ऐकत आहे आम्हाला खाजगी टँकर चालकाकडून दररोज १२० रुपये खर्च करून पाचशे लिटर पाणी घ्यावे लागते तर महिन्याला पाण्यावरच ३ हजार पेक्षा अधिक खर्च होत आहे शासनाने अधिक टँकर मंजूर करावे, अशी मागणी खंडाळा येथील ग्रामस्थ जमीर शेख यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *