Headlines

आमदार अब्दुल सत्तार यांनी बांधावर साजरी केली दिवाळी:कायगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद, मान्यवरांची हजेरी




आमदार अब्दुल सत्तार यांनी यंदाची दिवाळी सामान्य शेतकरी कुटुंबासोबत थेट त्यांच्या शेतवस्तीवर आणि बांधावर जाऊन साजरी केली. शेतकरी कुटुंबांना मायेचा आधार : दुष्काळ व विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कुटुंबांचे अर्थकारण कोलमडले असून त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतावर जाऊन दिवाळी साजरी करण्याचे ठरवले. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे पुंडलिक गंगाराम भोकरे यांच्या शेतवस्तीवर जाऊन शेतकरी कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष उपस्थित राहत त्यांनी कुटुंबांना मायेचा आधार दिला. दुःखाच्या अंधारात आनंदाचा दिवा : शेतकरी हा अन्नदाता आहे, तो संकटात असताना त्याच्यासोबत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी यंदाच्या दिवाळीत दुष्काळग्रस्त व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधला आणि दुःखाच्या वातावरणात आनंदाचा एक दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, माजी सरपंच राजेंद्र खरात, पांडुरंग जैवळ, बबनराव दाभाडे आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *