Headlines

अजित पवारांच्या अपघातावरून नवा वाद:अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरेंचा हात- कदम, विरोधी पक्षनेतेपदासाठी कदममाझ्या पाया पडले होते- तटकरे




उपमुख्यमंत्रिपदाच्या लालसेतून सुनील तटकरे यांचाच अजितदादांच्या विमान अपघातामागे हात असावा, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. यावर सुनील तटकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. रोहित पवारांची बेंगळुरूत धाव अपघातग्रस्त विमानाचा मेंटेनन्स बेस बेंगळुरूत असल्याने रोहित पवारांनी तिथे पोलिसांत धाव घेतली. मात्र, घटनास्थळ महाराष्ट्रात असल्याने व तपास ‘डीजीसीए’कडे असल्याने कर्नाटक पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. सत्तासंघर्ष दापोलीत तटकरेंनी योगेश कदमांविरोधात छुप्या पद्धतीने ताकद लावली. तसेच सिंचन घोटाळ्याचा दाखला देत तटकरेंनी सासवड प्रकल्प रखडवून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप कदमांनी केला. विरोधी पक्षनेतेपदासाठी कदम माझ्या पाया पडले होते : तटकरे “नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र दिले होते. त्यावेळी हेच रामदास कदम माझ्या ‘मेघदूत’ बंगल्यावर आले, ते माझ्या हातापाया पडले, विनवणी केली. त्यानंतर मी त्यांना माझ्या गाडीत बसवून अजितदादांकडे घेऊन गेलो आणि त्यामुळेच ते विरोधी पक्षनेते झाले. मी जे सांगतोय हे वक्तव्य खरं की खोटं, हे त्यांनी भरड नाक्यावरील काळकाई देवस्थानात जाऊन सांगावं!” दादांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी म्हणून आपण स्वतः केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरेंचा हात : कदम “सुनील तटकरेंना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे अजितदादांच्या घातपातामागे त्यांचाच हात आहे की काय, असा संशय येतोय. तटकरेंची राक्षसी महत्त्वाकांक्षा पाहता त्यांची सीआयडी किंवा उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. “तटकरे कधीच कोणाचे झाले नाहीत. बॅरिस्टर अंतुलेंचे पीए असताना त्यांनी त्यांनाच संपवले. जो जवळ करतो त्यालाच संपवण्याची ही प्रवृत्ती आहे. दादांनंतर पक्ष आणि पद आपल्या हातात यावे हीच यांची खेळी होती. लवकरच हे सुनेत्राताईंनाही समजेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *