.

धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा सोहळा तीन लाख भाविकांनी मोठ्या गजरात व जयघोषाने लोकर व भंडाऱ्याची उधळण करत सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मंदिरालगत असणाऱ्या ओढ्यात हुलजंती येथे मोठ्या उत्साहात गुरू-शिष्याच्या भेटीचा सोहळा पार पडला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशाततून भाविक मोठ्या संख्येने आले होते.
यावेळी पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके, ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे, उद्योगपती हनुमंत दुधाळ, उपसभापती अर्जुन मल्हाळे ,साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्या मोठे ,स्नेहा सोनकाटे आदीजण उपस्थित होते. यंदा पाऊस न हुलजंती येथे सोमवारी महालिंगराया-बिरोबा यांच्या पालखींची भेट झाली. यावेळी पालखी भेटीच्या ओढ्यात भेटीचा सोहळा पाहण्यासाठी तीन लाखांहून अधिक भाविक एकत्र आले होते. यावेळी भंडाऱ्याची उधळण झाली. आसमंत पिवळा दिसत होता. ( ड्रोन छाया : सुनील माळी व नवनाथ माळी, हुलजंती )
जगातील सहा देशात युद्ध पेटेल, समाजात नैतिकता राहणार नाही, पांढरे धान्य महागेल. सत्य टिकेल, असत्याने वागणारे उडून जातील. येणारा महिना त्रासदायक ठरणार,राजकारणाकत उलथापालथ होईल. राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या मारतील. येत्या पौर्णिमेच्या आसपास व येत्या वर्षात भरपूर पाऊस पडेल. खिलार गाई-बैल मिळणार नाहीत, संख्या कमी होईल. तर शेळ्या मेंढ्यांना चांगले दिवस येणार अशी भाकणूक झाल्याचे पुजारी मारुती पेटर्गे यांनी केली.
हुन्नूरचा बिरोबा, सोन्याळचा विठोबा, उटगीचा ब्रम्हदेव, जिरंकलगीचा बिराप्पा, शिराढोणची शिलवंती, हुलजंतीचा महालिंगराया, शिराढोणचा बिरोबा, कसगी येथील बरगालसिध्द या पालख्या भेटीच्या स्थळावर होत्या.