Headlines

सहकारमहर्षी कारखान्यात दोन लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन




सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या २ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते तसेच सहवीज प्रकल्पातून निर्मिती झालेल्या वीज युनिट पैकी २ कोटी २१ लाख व्या वीज विक्री युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक अमरदीप काळकुटे यांचे हस्ते संपन्न झाले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगतीपथावर वाटचाल चालू आहे. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, महादेव क्षीरसागर यांच्यासह सर्व संचालक कार्यकारी संचालक सुहास यादव व खातेप्रमुख, युनियन प्रतिनिधी, कर्मचारी व स उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *