Headlines

प्रगतीशील समाज बलशाली अन् सशक्त राष्ट्राचे प्रतीक:शामसुंदर सोनी यांचे प्रतिपादन, मूर्तिजापूर येथे माहेश्वरी समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात



मूर्तिजापूर विकासाच्या मार्गावर प्रगतिशील समाज बलशाली व सशक्त राष्ट्राचे प्रतीक आहे. मूर्तिजापूर शहरात घडलेले डॉक्टर, अभियंते, सीए, एमबीए, अन्य व्यावसायिक क्षेत्रांतील तरुण उच्च शिक्षण व अनुभव संपादन करून पुन्हा आपल्या कर्मभूमीत परततात. समाजासाठी योग

.

देशाकरिता असेच योगदान राहिले पाहिजे. महासभेला समाजातील घुंघट प्रथा दूर करण्यासाठी २५ वर्षे सतत प्रयत्न करावे लागले. याची आठवण करून दिली. पूर्वी विदर्भ क्षेत्रात माहेश्वरी समाजातील विवाहित महिलांच्या हत्या व आत्महत्यांच्या दुर्दैवी घटनांचा उल्लेख केला. मंगरूळपीर येथील ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली. कार्यक्रमाला महासभेचे मध्यांचल उपसभापती दिनेश राठी (नागपूर), अखिल भारतीय माहेश्वरी युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद सोनी (नागपूर), विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रमण हेडा, प्रदेशमंत्री सीए राजेश काबरा आदी उपस्थित होते.

माहेश्वरी समाजाचे मूर्तिजापूर अध्यक्ष पुरुषोत्तम डागा यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजाची वाटचाल, प्रगती, वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली यांचा परिचय करून दिला. समाजात सातत्याने शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सुरू आहेत. समाज प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे. उच्चशिक्षित पिढी आपल्या मातीशी व संस्कारांशी जुळलेली आहे. उच्चशिक्षित तरुणांनी शहरातच विविध व्यवसाय सुरू केले आहेत. डाळ मिल, ऑइल मिल, रासायनिक उद्योगांमध्ये त्यांनी यशस्वी प्रगती केली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. आदित्य डागा डी.एम. एंडोक्रायनोलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा करीत आहेत. डॉ. सरीता सिकची नेत्रशल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. संकेत सारडा गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांना सेवा देत आहेत. राजकीय क्षेत्रातही सक्रिय सहभाग आहे. सूत्रसंचालन सुशील सारडा यांनी केले. आभार खुशी राठी यांनी मानले.

येथे माहेश्वरी समाजाचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. सकारात्मक दृष्टिकोनातून आवश्यक अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे मध्यांचल उपसभापती दिनेश राठी यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, गत २७ वर्षांपासून माहेश्वरी महासभा व्यापार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवा विकास अशा विविध क्षेत्रांत अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत आहे. आंतरजातीय विवाह आज समाजासमोरील आव्हानात्मक बाब आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *