![]()
फटाके उडवण्यावरून झालेल्या वादात तिघांनी अमन शेख (२२) याला दांडक्याने मारहाण केली. विमाननगरमधील रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर झालेल्या या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाला. विमानतळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे राम नागनाथ नवले (१९), तेजस उमाकांत शिंदे (२०) आणि सम्यक संदीप साळवी (१८) अशी आहेत. नवले आणि शिंदे म्हाडा कॉलनी, विमाननगर येथे राहतात. साळवी चौधरीनगर, विश्रांतवाडी येथे राहतो. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमनचे वडील समीर शेख (५०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमन आणि त्याचे मित्र रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर फटाके उडवत होते. आरोपीही काही अंतरावर फटाके उडवत होते. त्यावरून दोन्ही गटांत वाद झाला आणि आरोपींनी अमनला दांडक्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक एस. क्षीरसागर तपास करत आहेत. फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग गुरुवार पेठेत फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग लागली. मंगळवारी रात्री पंचहौद मिशनजवळील भंडारी वाड्यात ही घटना घडली. वाडा मोडकळीस आल्याने तेथे कोणी राहत नव्हते. वाड्यातून धूर येत असल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. वाडा धोकादायक असल्याने महापालिकेच्या घरपडी विभागाला कळवण्यात आले. अरुंद गल्लीत दाट वस्तीमध्ये हा वाडा आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले. जुन्या वाड्यात पेटता फटाका पडल्याने आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशामक दलाचे अधिकारी संजय रामटेके आणि प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० जवानांनी पाण्याचा मारा केला. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली. वाडा कोसळण्याची शक्यता असल्याने मालकांना याची माहिती देण्यात आली. वाड्यात कोणी राहत असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. ———- अंधेरीत फटाके फोडण्याच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला:पती-पत्नीसह मुलगी गंभीर, चौघांना अटक, मरोळ परिसरातील घटना
अंधेरी पूर्वेतील मरोळ येथील कृष्णानगर परिसरात फटाके फोडण्याच्या किरकोळ वादातून एका कुटुंबावर गुंडांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी टोळीप्रमुख गोस्वामी याच्यासह चार आरोपींना अटक केली आहे. सविस्तर वाचा
Source link