Headlines

पक्षी संवर्धनासाठी रामकुंड ते नांदूरमध्यमेश्वर परिक्रमा:महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणाबाबत मार्गातील गावांमध्ये केली जनजागृती



पक्षी सप्ताहानिमित्त नाशिकच्या रामकुंड ते नांदूरमध्यमेश्वर पक्षी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. नाशिक शहरापासून नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यापर्यंत आयोजित या परिक्रमेत पक्षीनिरीक्षणासोबतच मार्गातील गावांमध्ये पक्षी व निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्य

.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, परिक्रमेचे संयोजक तथा पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा, डॉ. अनिल माळी, पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष मधुकर जगताप, उमेश नागरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक व निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांच्या स्मृती तसेच पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहातून पक्ष्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण याबाबत जनजागृती केली जाते. नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य, वन्यजीव विभाग, नेचर क्लब ऑफ नाशिक, पक्षीमित्र मंडळ नाशिक, अरण्यांनी बायो कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वेटलँड एज यांच्या संयुक्त विद्यमाने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्रमेत केवळ पक्षीनिरीक्षणावर भर न देता मार्गातील गावांमध्ये पक्षी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात आला.

यावेळी विविध गावांमध्ये वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, परिक्रमेचे संयोजक तथा पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा, डॉ. अनिल माळी, पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष मधुकर जगताप, वनपाल राजेंद्र दौंड, वनरक्षक कैलास सदगीर, गोरख पाटील, पक्षीमित्र अनंत सरोदे, गंगाधर आघाव, पंकज चव्हाण, रोहित मोगल आणि रोषण पोटे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व याबाबत माहिती नांदूर, माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव, चितेगाव फाटा, चांदोरी आदी गावांमध्ये पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व, नैसर्गिक अधिवास, पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन, जैवविविधता आणि पक्ष्यांना भेडसावणारे धोके याबाबत जनजागृती करण्यात आली. अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक व निसर्गप्रेमींना सहभागी करून घेत, पक्षीसंरक्षणात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *