Headlines

अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी पुण्यात वाहतूक बदल:15 आणि 16 नोव्हेंबरला अनेक रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई; काही मार्ग वाहतुकीसाठी बंद




केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त 15 आणि 16 नोव्हेंबरला शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता आणि रामवाडी ते मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी या मार्गांवर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई आहे. कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि 509 चौक ते लोहगावचा हवाई दलाचा तळ या मार्गांवरही वाहने लावता येणार नाहीत. सोमवारी (16 नोव्हेंबर) सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळात अमित शहा यांचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम संपेपर्यंत सकाळी 9 नंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल, पेरुगेट पोलीस चौकी ते पावन मारुती मंदिर आणि भरत नाट्य मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई असेल. सोमवारी सकाळी 7 नंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांनी किराड चौकातून जीपीओमार्गे हॉटेल ब्ल्यू नाईल चौकात जावे आणि तेथून पुढे इच्छितस्थळी जावे. पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्ल्यू नाईल चौक हा मार्गही बंद राहील. जिल्हा परिषदेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर आणि ब्ल्यू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *