Headlines

समृद्धी महामार्गावरील कंटेनर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल:कंटेनरचालक फरारच, लोखंडी साहित्याचे गूढ कायम




हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोल नाक्यासमोर खडकपूर्णा नदीच्या पुलावर शुक्रवारी २० वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या नागपूर पासिंगच्या कंटेनर (एमएच ४० बीएल ४९११) चालकावर किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला असून पोलिस त्याचा व वाहन मालकाचा शोध घेत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खडकपूर्णा नदीच्या पुलावर वाहतूक कोंडीमुळे वाहने रांगेत उभी होती. तेव्हा नागपूरहून भरधाव आलेल्या लोखंडी सामानाने भरलेल्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. या कंटेनरने आधी पोलिसांच्या वाहनाला आणि त्यानंतर शुभम साळवे यांच्या कारसह एकूण १९ वाहनांना जोरदार धडक दिली. यात साळवे यांची कार दुभाजकाला धडकून उलटली व अनेक प्रवासी जखमी झाले. चालकावर हे गुन्हे दाखल बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे, लाखो रुपयांचे नुकसान करणे आणि जखमींना मदत न करता पळून जाणे (‘हिट अँड रन’) या आरोपांखाली चालकावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले या अपघातात नुकसान झालेल्या १९ वाहनांपैकी बहुतांश वाहनांचे नुकसान झाले होते. मालकांनी तात्पुरती दुरुस्ती करून आपली वाहने नेली. विशेष म्हणजे, या वाहनधारकांचा टोल चुकला नाही. दुसरीकडे, कंटेनरमधील लोखंड कोणाचे याचा तपास बाकी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *