Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:फोन कॉल, चॅट म्हणजे हत्येचा कट नव्हे; सियाचा जामिनासाठी युक्तिवाद, पोलिस तपास व पुराव्यांना बचाव पक्षाचे आव्हान



लोहगड किल्ल्याच्या परिसरात केतन अग्रवाल याचा सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून झालेला मृत्यू हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जाच्या निमित्ताने बचाव पक्षाने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नच

.

या प्रकरणी तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. सिया तरुण वयाची असून, खटला पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने तिला कारागृहात ठेवू नये, अशी मागणी बचाव पक्षाने केली आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर १७ नोव्हेंबरला सुनावणी अपेक्षित असून, पोलिसांचे पुरावे आणि बचाव पक्षाचे आक्षेप यांची न्यायालयात कसोटी लागणार आहे.

डिजिटल पुराव्यांसोबत तीन साक्षीदारांवर खटल्याची भिस्त

पोलिसांनी ५ हजार ५३ पानांचे भक्कम आरोपपत्र दाखल करून तपास पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. यात डिजिटल पुराव्यांसोबतच तीन महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे साक्षीदार नेमके कोण आहेत आणि त्यांनी घटनेच्या दिवशी काय पाहिले, यावरच या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे. आरोपी सिया गोयल हिला जामीन मिळवून देण्यासाठी तिचे तरुण वय आणि खटल्यास लागणारा वेळ, हा बचाव पक्षाचा प्रमुख युक्तिवाद असला तरी, पोलिसांकडील डिजिटल पुरावे न्यायालयात किती भक्कम ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जामीन अर्जात सियाचे हे चार प्रमुख मुद्दे

1 घटनेनंतर केतनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या वेळी ज्या ठिकाणाहून केतन पडल्याचे सांगितले जात होते, तेथून तो पडणे शक्य नसल्याचा संशय कुटुंबीयांना आला. 2 दरम्यान, केतनच्या चुलत्यांच्या मित्राने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली. त्यानंतर संशयाच्या आधारे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, आरोपींना अटक करताना त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता, असा बचाव पक्षाचा दावा आहे. 3 सिया आणि चेतन यांच्यातील फोन कॉल आणि चॅटिंगच्या आधारे हत्येचा कट रचल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. दोन व्यक्तींमध्ये संवाद झाला म्हणजे त्यांनी हत्येचे नियोजन केले, असे होत नाही. 4 आरोपींच्या कथित कबुली जबाबांव्यतिरिक्त स्वतंत्र आणि सबळ पुरावे नसल्याचेही बचाव पक्षाचे म्हणणे आहे. केतनचा मृत्यू फोटो काढताना झालेला अपघात होता, असा दावा करण्यात आला आहे.

केतन मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, प्रेमसंबंधांच्या संशयातून या प्रकरणाला वेगळे वळण लागले. बचाव पक्षाने नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. पोलिसांकडे घटनेच्या दिवशीचा थेट पुरावा नाही, तर केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर आणि मोबाइल चॅटिंगवर खटला उभा केला जात आहे, असे चित्र बचाव पक्षाला न्यायालयात निर्माण करायचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *