Headlines

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी लवकरच निधी देणार- उपमुख्यमंत्री शिंदे:श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटनेच्या निवेदनावर संभाजीनगरात शिंदेंची ग्वाही



वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याच अनुषंगाने सोमवारी (दि. ९) चिकलठाणा विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघट

.

जालन्यातील दौऱ्याहून परत जाताना विमानतळावर संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवाजी ढेपले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिंदे यांना निवेदन दिले. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या ‘वृत्तपत्र विक्रेता स्वातंत्र्य कल्याणकारी मंडळा’साठी तातडीने जीआर काढावा, मंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व शासनस्तरावर विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणी केली.

त्यावर बोलताना, तुमच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा आम्ही केली आहे. लवकरच जीआर व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. तसेच लवकरच समिती स्थापन करून विक्रेत्यांना दिलासा देऊ, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी प्रा. शिवाजी ढेपले, प्रकाश वाघ, विष्णू ढाकणे, गोपीनाथ माळी, शहर अध्यक्ष किशोर लहाने, मनोज बुऱ्हाडे, अजिनाथ बांगर, रामकृष्ण राऊत, राजू गायकवाड, दिनकर धनवे, प्रभाकर डेरे, संतोष जटाळे, विठ्ठल पारटकर, नितीन दहाड, अशोक खंदारे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *