Headlines

पुण्याच्या वैशाली, रूपाली हॉटेलचे परवाने निलंबित:एफडीएची कारवाई, तपासणीत दोन्ही हाॅटेलांत स्वच्छतागृहाशेजारी आढळले खाद्यपदार्थ




अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुण्यातील फर्ग्युसन (एफसी) रोडवरील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे तपासणीत उघड झाल्याने या दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. जोपर्यंत त्रुटींची पूर्तता करून प्रशासनाची लेखी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत या दोन्ही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी करता येणार नाही. अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य उमाप यांनी वैशाली हॉटेलची तपासणी केली. यात हॉटेलला ९८ पैकी अवघे ५८ गुण मिळाले. स्वयंपाकघरात स्वच्छतागृहाजवळ फ्रीजर आणि साहित्य होते. त्रुटी दूर केल्यानंतरच परवानगी बहाल होणार वैशाली हॉटेलात उकडलेले बटाटे, शिजवलेला भात उघड्यावर ठेवले होते. कच्च्या भाज्या तयार अन्नावर ठेवल्याने संसर्गाचा धोका होता. तर रूपाली हॉटेलच्या तपासणीतही असुरक्षित स्वयंपाकघर, अस्वच्छता, साचलेले पाणी व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नव्हते. कच्चा माल आणि तयार पदार्थ झाकून न ठेवणे, पदार्थांवर लेबल व वापरण्याची अंतिम तारीख नसणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदी नसणे अशा अनेक त्रुटी प्रशासनाला आढळल्या. त्रुटी दूर केल्याचे सिद्ध केल्यानंतरच या दोन्ही हॉटेल्सना रवानगी मिळेल. जून महिन्यातच एफडीएने वैशाली हॉटेलला त्रुटी सुधारण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, प्रशासनाच्या सूचनेकडे सातत्याने दुर्लक्ष करत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच ठेवल्याने अखेर निलंबनाची कठोर कारवाई प्रशासनाला करावी लागली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *