![]()
रोहित पठारे हत्याकांडातील सर्व २६ आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, यात एका अल्पवयीनचाही समावेश आहे. मात्र, अटकसत्र पूर्ण होताच शनिवारी अटकेतील तरुणांच्या कुटुंबातील महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गाठत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. घटनास्थळी नसलेल्या १४ तरुणांना हत्येच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे रोहितच्या मारेकऱ्यांना शिक्षेची मागणी आहे, तर दुसरीकडे निष्पापांना वाचविण्याच्या आग्रहाने गुन्ह्यातील सहभाग ठोस पुराव्यांनिशी सिद्ध करण्याची जबाबदारी एसआयटी पथकावर आली आहे. रोहितच्या मृत्यूनंतर उसळलेला जनक्षोभ, पोलिस ठाण्याला घेराव, रास्ता रोको आणि आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या परिस्थितीत पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी संवादकौशल्याच्या बळावर आंदोलकांना सामोरे जात परिस्थिती हाताळली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच अनुभवी अधिकाऱ्यांचे एसआयटी पथक तपास करीत आहे. आता अटकेतील प्रत्येकाची भूमिका, परस्परविरोधी दावे आणि उपलब्ध पुराव्यांची सांगड घालण्याचे आव्हान पथकासमोर आहे. १६ नोव्हेंबरला प्रस्तावित मोर्चा आणि आरोपींची न्यायालयीन हजेरी एकाच दिवशी असल्याने तपासाबरोबरच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल, शस्त्रजप्ती, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांतील सुसंगती निर्णायक ठरणार आहे. आता न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याची लढाई आहे. दोषारोपपत्रातील पुराव्यांची मजबुती महत्त्वाची ठरणार आहे. गुन्हा सिद्धीची लढाई
Source link
पठारे हत्या प्रकरण, तपास एसआयटीकडे:पथकामध्ये डीवायएसपींसह पाच अधिकारी, सर्व 26 आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश