![]()
‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’, ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ आणि ‘श्री अन्नपूर्णामाता की जय’ अशा जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेचे गुरुवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथून उत्साहात प्रस्थान झाले. न्यासाचे संस्थापक
.
गेल्या २९ वर्षांपासून न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखी-पादुका परिक्रमेचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या परिक्रमेचे ३० वे वर्ष आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश इंगळे, देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे पूजन करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला.
न्यासाच्या महाप्रसादानंतर अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रींची महानैवेद्य पूजा करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादालयात पालखी पूजन झाले. न्यास परिसरातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर आणि श्री भवानी माता मंदिर येथेही पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अन्नछत्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड आणि कारंजा चौक मार्गे बुधवार पेठेतील समाधी मठ येथे पालखी पोहोचली. तेथे आरती झाल्यानंतर श्री मल्लिकार्जुन मंदिर आणि बसस्थानक परिसरातील शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री खंडोबा मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. १२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे पालखीचा मुक्काम असून, १४ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, प्रा. सायबण्णा जाधव, पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांच्यासह भक्तगण, सेवेकरी, वारकरी आणि कर्मचारी उपस्थित होते. शहरातील विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले (९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे.
भक्तांच्या सेवेसाठी स्वामींची पालखी गावोगावी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन आणि सेवा महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या भक्तांना घेता यावी, तसेच अक्कलकोट येथे येणे शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर भाविकांना स्वामींचे दर्शन मिळावे, या उद्देशाने पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते. स्वामी भक्तांच्या दारी येत असल्याची भावना या परिक्रमेच्या माध्यमातून अनुभवता येते.